कोरोना परिस्थितीसंबंधी प्रधानमंत्री साधणार सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद

 कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीतिचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री साधणार सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद 
नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्यामुळे चिंता वाढली आहे. त्याच पार्शवभूमीवर आज प्रधानमंत्री मोदी यांनी दुपारी 4 वाजता देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. विडिओ कॉन्फरेनसिंग द्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार अहेत. बैठकीत वाढत्या कोरोना संख्येच्या परिस्थितीवर आढावा घेतला जाणार.
कोरोना संख्येचा विस्फोट होत असताना गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 13 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले अहेत तर 277 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर गेल्या 24 तासात 69 हजार 959 कोरोना रुग्ण बरे झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.आज प्रधानमंत्री वाढत्या कोरोना परिस्थितीवर सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार अहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या ऑनलाईन बैठकीत सहभागी होणार अहेत.


Previous
Next Post »