उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा धक्का, कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देऊन भाजपाला सोडून समाजवादी पक्षात केला प्रवेश
लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी सरकार मधील कॅबिनेट मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्री पदाचा तडखाफडकी राजीनामा देऊन भाजपाला सोडचिट्टी देऊन समाजवादी पक्षात केला प्रवेश. हा भाजपासाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल.उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा देऊन पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून भाजपात अशा प्रकारे भूकंप झाल्याने उत्तर प्रदेश भाजपात खळबळ उडाली आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पाठोपाठ इतर ही काही नेत्यांनी भाजपाशी फारकत घेतली असल्याचे बोलले जात आहे. हा मोठा धक्का भाजपासाठी मानला जात आहे.उत्तर प्रदेश मध्ये बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसून येत आहे.भाजपाला सोडण्याची सुरुवात स्वामी प्रसाद मौर्य यांच्या पासून झाली. आता आणखी 12 आमदार भाजपाला सोडणार अहेत. 'असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षासोबत आघाडी करून निवडणूक लढविणार असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन नक्की होणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसापूर्वी एक वक्तव्य वक्तव्य केलं होतं की राज्यातील 80 टक्के लोकं भाजपा सोबत अहेत. यावर खा.संजय राऊत म्हणतात 80 टक्के लोक भाजपासोबत अहेत तर मग 20 टक्के कोण लोक अहेत ते तरी भाजपाने सांगावे. एखाद्या समाजाला लक्ष करणं योग्य नाही. उत्तर प्रदेशात आता बदलाचे वारे वाहत अहेत असं देखील खा. संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon