शरद पवारांच्या अडमुठ्या भूमिकेमुळेच 67 एसटी कर्मचारांचा जीव घेतला ; गुणरत्न सदावर्ते यांचा आरोप

शरद पवारांच्या अडमुठ्या भूमिकेमुळे एसटीच्या विलिनीकरनाला उशीर होतोय - गुणरत्न सदावर्ते 
मुंबई : शरद पवारांच्या अडमुठ्या भूमिकेमुळेच 67 एसटी कर्मचाऱ्यांचा जीव घेतला असल्याचा आरोप विलीनीकरणासाठी आंदोलन कणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. विलीनीकरणासंदर्भात तीन सदस्यांची समिती नेमली आहे. समितीचा अहवाल 12 आठवड्यात येणार आहे. परंतु समितीचा अहवाल येईपर्यंत अजून किती कर्मचाऱ्यांचे जीव घेणार आहात असा सवाल देखील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शरद पवारांना उद्देशून केला आहे.

राज्य सरकारची उदासीनता आणि शरद पवारांची अडमुठी भूमिका यामुळे आता पर्यंत 67 एसटी कर्मचारांचा जीव गेला आहे.असं वकील सदावर्ते यांनी म्हटलं आहे.सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत अजून किती कर्मचाऱ्यांचा जीव घेणार आहात.खरचं तुम्हाला आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे मृत्यू थांबवायचे असतील तर राज्य सरकार समितीचा अहवाल आज घेऊन या उद्याच न्यायालयात सुनावणी होऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल लागेल.
शरद पवार कर्मचाऱ्यांसमोर क्लीनबोल्ड -
शरद पवार हे एसटी कर्मचाऱ्यांसमोर क्लीनबोल्ड झाले अहेत.शरद पवारांनी कृती समितीची बैठक घेऊन जसा काही मास्टर स्ट्रोक खेळला असं दाखवलं आहे.परंतु एसटी कर्मचाऱ्यांसमोर ते क्लीनबोल्ड झाले अहेत.सदावर्ते यांनी म्हटलं आहे की इंग्रजानी सुद्धा कलम 151अनुसार वापर करून कार्यवाही करताना कोणालाही सकाळी झोपेतून उठवून नेलं नाही. परंतु राज्य सरकारने अशा प्रकारची कार्यवाही कर्मचाऱ्यावर केली आहे. ते पुढे म्हणतात नाशिक मधील 12 ते 16 एसटी कर्मचाऱ्यांना सकाळी झोपेतून उठवून नेलं आहे.

शरद पवार कर्मचाऱ्यासोबत क्लीनबोल्ड झाल्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यावर अशा प्रकारची कार्यवाही केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बळाचा गैर वापर करून एसटी कर्मचाऱ्यांना सकाळी झोपेतून उठवून नेऊन कार्यवाही केली आहे.कर्मचाऱ्यांनी शरद पवारांना जुमानलं नाही. ते क्लीनबोल्ड झालेत. कर्मचाऱ्यांसमोर येऊन ते तोंड दाखवू शकत नाहीत असं ठामपणे सांगतो असं देखील यावेळी सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री वारंवार म्हणतात की विलीनीकरणाच्या संदर्भाने तीन सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. 12 आठवड्या नंतर समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेऊ.पण मुख्यमंत्री हे कायदे मंडळाचे प्रमुख म्हणून तुम्हाला यावर निर्णय घेण्यास न्यायालकडून सांगण्यात आलं आहे.त्यामुळे आता निर्णय मुख्यमंत्र्यांनीच घ्यायचा आहे.एसटीच्या विलीनिकरणाचा निर्णय न्यायालय कर्मचाऱ्यांच्या बजे देणाराच आहे परंतु शरद पवारांच्या अडमुठ्या भूमिकेमुळे विलंब होत आहे. असं देखील वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

Previous
Next Post »