कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता 55 वर्षावरील पोलिसांना वर्क फ्रॉम होमचा आदेश
मुंबई : राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमुळे राज्याची चिंता वाढली आहे. त्यामुळे आपल्या जिव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांना ही आता वर्क फ्रॉम होमचा आदेश देण्यात आला आहे . 55 वर्षावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता घरी राहूनच काम करायचं आहे. पोलीस हे जनतेची सुरक्षा करण्यासाठी आपल्या जिवाची परवा न करता अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सुरक्षेची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.राज्यात गेल्या 24 तासात 71 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली.म्हणून याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती दिली आहे.राज्यात कोरोना वाढीचा संभाव्य धोका लक्षात घेता 55 वर्षावरील पोलिसांना वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेश जारी केला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी मध्यमांशी बोलता सांगितले आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon