विलीनिकरणाच्या मुद्यावर मागील 2 महिण्यापेक्षा अधिक काळापासून संपावर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी व सेवा समाप्ती करण्यात आली आहे. तरीही बरेच कर्मचारी अजूनही संपवार ठाम अहेत.महामंडळाने वेतन वाढ केली आणि जे कर्मचारी कामावर रुजू होतील त्यांची बडतर्फी, निलंबन व सेवा समाप्तीची कार्यवाही मागे घेतली जाईल असही सांगण्यात आलं आहे परंतु अजून बरेच कर्मचारी विलीनकरणाच्या मुद्यावर ठाम असल्याने संपात सहभागी अहेत.
दरम्यान मागील दोन महिन्यात अनेक कर्मचारी सेवा निवृत्त झाल्याने आता 88 हजार 347 एवढी कामाचारी संख्या झाली आहे.या पैकी 24 हजार 640 कर्मचारी सेवेत रुजू झाले अहेत तर 63 हजार 707 कर्मचारी अजूनही कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे त्यांना मागील दोन महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही.
तसेच यामध्ये 11 हजार 24 कर्मचारी निलंबित असून 1 हजार 513 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे.तर 3 हजार 593 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यात आली असून कारणे दाखवा अशी नोटीस देण्यात आलेली आहे.तसेच 2 हजाराच्या आसपास रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon