गॅस गळतीमुळे मिल मधील 6 कामगांचा मृत्यू झाला तर 20 जनांची प्रकृती चिंताजनक
सुरत : गुजरात मधील सुरत शहरातील विश्वप्रेम डाईंग अँड प्रिंटिंग मिल जवळ टँकर मधून गॅस गळती झाल्याने गुदमरून मिलमधील 6 जनांचा मृत्यू झाला आहे तर इतर 20 जनांची प्रकृती चिंताजनक आहे.पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झालं.या बाबतीत अधिक माहिती अशी आहे की, एका टँकर मधून मिल जवळ असलेल्या नाल्यात विषारी द्रव्य टाकत असताना गॅस गळती झाली.
टँकर मधील गॅसच्या गळतीमुळे विषारी वायुच्या संपर्कात मिलमधील कामगार आल्याने गुदमरून 6 जनांचा मृत्यू झाला तर अन्य 20 जनांची प्रकृती चिंताजनक आहे.या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना ताबडतोब उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या घटनेत 6 कामगारांचा जिव गेल्याने परिसरात खळबल उडाली आहेत. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon