महाराष्ट्रात तूर्तास लॉक डाऊन नाही, राज्यसरकारचा मोठा निर्णय, परंतु निर्बंध अधिक कडक होणार
मुंबई : राज्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्यमुळे चिंता वाढली असताना आज टास्क फोर्सच्या झालेल्या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊन लावले जाणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. ही राज्यासाठी आनंदाची बातमी असली तरी निर्बंध मात्र अधिक कडक केले जाणार अहेत.याबाबत उपमुख्यमंत्री अजीत पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा करून हा निर्णय घेतला असल्याचे कळते.
मंगळवारी राज्यात 18 हजार 466 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.तर4 हजार 558 रुग्ण कोरोना मुक्त झाले अहेत. तसेच मंगळवारी 75 ओमायक्रोनचे रुग्ण आढळून आले अहेत.आता पर्यंत 653 ओमायक्रोन रुग्णांची राज्यात नोंद झाली असून 259 रुग्ण ओमायक्रोन मुक्त झाले अहेत.राज्यात दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढणारी बाब आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon