उत्तर प्रदेशात विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी काँग्रेसने 125 उमेवरांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये काँग्रेसने 40 महिलांना व 40 युवकांना संधी दिली आहे. जाहीर केलेल्या पहिल्या यादीत काही पत्रकार, संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना खूप अन्याय सहन करावे लागलेत अशा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्याच पार्शवभूमीवर बलात्कार पीडित मुलीची आई अशा सिंग यांनाही उमेदवारी दिली आहे.त्या आपला संघर्ष यापुढेही चालू ठेवतील.
भाजपाला भरली धडकी -
काँग्रेसने 50 टक्के महिलांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवल्याने भाजपाच्या छातीत धडकी भरली आहे.महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने आपण त्यांना संधी दिल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.अत्याचार सहन करणाऱ्या महिकांचा आवाज आम्हाला बनायचं आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.काँग्रेस ने 50 टक्के महिलांना उमेदवारी दिल्याने भाजपाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
2017 साली उन्नाव मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकारणी भाजपाचे आमदार कुलदीप सेंगर यांना जन्म ठेपेची शिक्षा झाली होती सोबत 10 लाखांचा दंड देखील लावला होता.
ConversionConversion EmoticonEmoticon