हरियाणाच्या भिवानी जिल्ह्यात भूस्खलन ; अनेक वाहणे ढिगाऱ्याखाली दबली,एक जनाचा मृत्यू.


          (फोटो एएनआय च्या सौजन्याने )
हरियाणात भूस्खलन अनेक वाहनासहित लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, तिघांना बाहेर काढले तर एकाचा मृत्यू 

हरियाणा : भिवानी जिल्ह्यात डोंगर खचल्याची नुकतीच एक घटना घडली असून ढिगाऱ्याखाली 8 ते 10 वाहने दबळे असल्याने त्यातील लोकही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याने चिंता व्यक्ती केली जाते.या घटनेत आतापर्यन्त 3 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे तर एक जनाचा मृत्यू झाला असल्याचे कळले आहे.घटना स्थळावर मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु  असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची मिळालेली माहिती अशी की भिवानी जिल्ह्यातील डाडम खान क्षेत्रामधील डोंगराचा भाग खचल्याने ही घटना घडली असून प्रशासनाच्यावतीने घटना स्थळी बचाव व मदत कार्याला ताबडतोब सुरुवात झाली आहे. दरम्यान घटनेचे माहित मिळताच कृषी मंत्री जेपी दलाल आणि एस पी अजीत सिंह शेखावत यांनी घटना स्थळाला भेट देऊन पाहाणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे.घटना स्थळी डॉक्टरांची टीम दाखल झाली असून जखमिंना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

 या घटनेतील जखमींना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करणार असल्याचे कृषी मंत्री जेपी दलाल यांनी सांगिले आहे.डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेत अनेक जन गाड्यांसहित ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती आहे.सध्या बचाव व मदत कार्य जलद गतीने चालू आहे.तसेच या दुर्घटनेतील जखमींना दवाखान्यात भरती करण्यात आले आहे.
Previous
Next Post »