तिरंगा रॅलीच्या सभेत असुदोद्दीन ओवैसीने सरकार वर साधला निशाणा


मुंबईतील एमआयएमच्या तिरंगा रॅलीच्या सभेत खा. असुदोद्दीन ओवेसी यांनी आघाडी सरकारवर साधला निशाणा
मुंबई : काल 11 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये एमआयएम पक्षाच्यावतीने आयोजित तिरंगा रॅलीच्या सभेत पक्षाचे अध्यक्ष असुदोद्दीन ओवेसी यांनी राज्य सरकारवर चांगलेच तोंड सुख घेतले.काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी धर्मनिरपेक्षेच्या नावाखाली मुस्लीमांची फसवणूक केल्याचा आरोप देखील केला.

उच्च न्यायालयाने मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण लागू केले असताना त्याची अंमलबजावणी का केली नाही. राज्यातील 83 टक्के मुस्लिमांना जमिनी नाहीत.20 हजार वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के मुस्लिम उदरनिवाह करतात. मुस्लिमांचे शिक्षणाचे प्रमाण पदवी पर्यन्त 4 टक्के आहे.मुस्लिमांचा विकास व्हावा यासाठी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काय केले असा सवाल देखील ओवेसी विचारला.

धर्मनिरपेक्षतेचा डंका वाजवणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हिंदुत्ववादी शिवसेने सोबत कशी गेली.बाबरी मस्जित पाडण्यात शिवसेनाचा मोठा वाटा असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत जाहीर सांगतात आणि त्याचे समर्थन करतात. अशा शिवसेने सोबत सेक्युलर म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार बनवतात. हे कसले सेक्युलर आहेत?अस देखील ओवेसी यांनी जाहीर सभेत बोलताना म्हटलं आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी या सरकारमधील पक्षांनी  कोरोनाच्या नावाखाली तिरंगा रॅली अडवण्याचा प्रयत्न केला.हे आता तिरंग्याचा सुद्धा विरोध करू लागलेत तर हे कसले राष्ट्रवादी आहेत. एमआयएम च्या भीतीने जमाव बंदी लागू केली. उद्या राहुल गांधी महाराष्टात येणार आहेत तेव्हा कलम 144 लागू करणार का? असा देखील सवाल सरकारला विचारला.

महाराष्ट्र प्रदेश एमआयएमच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील कार्यकर्ते मोठ्यासंख्येने रॅलीस उपस्थित होते.एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात रॅलीचे काढण्यात आली होती.चांदिवली येथे तिरंगा रॅलीच्या जाहीर सभेत खा इम्तियाज जलील बोलताना म्हणले सरकार एमआयएम ला घाबरून तिरंगा रॅली अडवण्याचा प्रयत्न करत आहे. वक्फ बोर्डाच्या हजारो एकर जमिनी सत्ताधाऱ्यांनी लाटल्या आहेत त्या परत करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा ईशारा देखील जलील यांनी यावेळी दिला.

ConversionConversion EmoticonEmoticon

:)
:(
=(
^_^
:D
=D
=)D
|o|
@@,
;)
:-bd
:-d
:p
:ng