जन्म दात्या आईने नवजात बाळाला दिले फेकून परंतु कुत्र्यांनी केला रातभर सांभाळ
छत्तीसगड : छत्तीसगड मध्ये मुंगेली जिल्ह्यातील लोरमी भागात हृदय हेलावून टाकणारी आणि माणुसकीला काळिमा लावणारी घटना घडली आहे. एका निर्दयी आईने नवजात मुलीला फेकून दिले मात्र रात्रभर कुत्र्यांनी त्या बळाचा सांभाळ केला. आश्चर्याचीबाब म्हणजे तिथे घोळक्याने असलेल्या कुत्र्यांनी त्या बाळाला कुठलीच इजा न करता रातभर मायेची उब दिली.
नवजात बाळाला कचराकुंडीत किंवा अडचणीच्या ठिकाणी फेकून देण्याच्या घटना समाजात नेहमीच घडतात. अशा घटना आपण नेहमीच पहातो.मात्र नवजात बाळाला रात्रभर कुत्र्यांनी सांभाळून त्या निर्दयी आईला एक प्रकारे चपराक दिली आहे. या घटनेवरून प्राण्यातही माणुसकी असल्याचे दिसून आले आहे.
सकाळी लोकं फिरायला जात असताना रस्त्याच्या बाजूला कुत्र्यासोबत नवजात बाळ दिसून आल्याचे पाहिल्यानंतर नागरिकही आवाक झाले.
ConversionConversion EmoticonEmoticon