सिंधुदुर्ग येथील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब वरील हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप
सिंधुदुर्ग : कणकवली येथील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडल्याने जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष परब याच्यावरील हल्ला आमदार नितेश राणे आणि जिल्हापरिषद माजी अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून केला असल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे.
संतोष परब हा सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा समर्थक तथा शिवसेना कार्यकर्ता आहे. परब यांच्यावर हल्ला करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून हल्ल्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.ताब्यात घेतलेल्या हल्लेखोरांनी गुन्ह्यांची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र हा हल्ला कोणाच्या सांगण्यावरून व का करण्यात आला याची माहिती अजून मिळाली नसल्याचे कळते.
हल्ल्यात वापरण्यात आलेली इनोव्हा करा ही फोंडाघात चेकपोस्ट वर पोलिसांनी पकडली असून त्यातील चारही हल्लेखोरांना पोलिसांनी पकडून ओरोस पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी करण्यात आली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः बंद खोलीत कसून चौकशी केली.परंतु चौकशीचा तपसील अजून कळू शकला नाही.
संतोष परब यांच्यावरील हल्ला आमदार नितेश राणे आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सांगण्यावरून गुंडामार्फत केला असल्याचा आरोप जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी हल्ल्यात जखमी संतोष परब यांची विचारपूस करून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील संतोष परब यांची विचार पूस केल्याने या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याचे कळते.आज रविवार रोजी चारही आरोपीना न्यायालयात हजार करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon