मुंबईत दूषित खाद्य तेल बेकायदा विक्री करणाऱ्यावर अन्न व औषधी प्रशासनाची कार्यवाही
मुंबई : आपण पहातो कि हॉटेल्स आणि रस्त्यावरील फास्ट फूड विक्रेते हे तळीव पदार्थासाठी एकाच खाद्य तेलाचा वारंवार वापर करतात. तळलेल्या तेलाचा वारंवार वापर केल्यास ते आरोग्यास अपायकारक ठरू शकते. अशा खाद्यतेलाचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब, अल्झायमर, यकृतरोग होण्याचा जास्त धोका असतो. म्हणून अशा तेलाची बेकायदा विक्री करणाऱ्या व वापरणाऱ्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA)कारवाई सुरू केली आहे.
तसेच खाद्य तेलाचा वारंवार वापर टाळा, आपले आरोग्य सांभाळा’, असे आवाहन देखील केले आहे.स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम करण्याची किंवा तळण्यासाठी तेच तेल वापरने सर्रास पणे चालू असते . मोठे खाद्य व्यावसायिक आपल्याकडे वापरलेल्या तेलाची विल्हेवाट लावतात; परंतु काही वेळा ते तेल स्वस्तात लहान खाद्यविक्रेत्यांना विकतात. तसेच रस्त्यावरही अनेक खाद्यपदार्थाचे ठेले लागतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेलाचा वापर होतो. परंतु, अशा ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या तेलाची गुणवत्ता तपासली जात नाही .
अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने एकूण तेल शुद्धीकरणासाठी असणारी टीपीसी मर्यादा २५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावी असे सांगितले आहे; मात्र वारंवार तेल तळल्यामुळे त्याचे गुणधर्म बदलतात ते टीसीपी मर्यादा ओलांडते. त्यामुळे असे तेल मानवी सेवनासाठी घातक असते, असे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी सांगितले. त्यामुळे तेलाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी व दूषित तेलाच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी तेलाबाबत सुद्धा काळजी घ्या आणि तळण्यासाठी तेलाचा वारंवार वापर टाळा.वापरलेले तेल एक किंवा जास्तीत जास्त दोन दिवसांत वापरावे.तेलातून निळा राखाडी धूर किंवा कडक फेस दिसल्यास किंवा तेल घट्ट होत असल्याचे आढळून आल्यास असे तेल टाकून द्यावे.हे तेल नालीत न टाकता मातीत किंवा निर्जन ठिकाणी टाकावे.
ConversionConversion EmoticonEmoticon