राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही,म्हणून हे सरकार फार काळ टिकणार नाही
बीड : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत . मात्र दुसरीकडे भाजपचे नेते सरकार पडण्याबद्दल नेहमीच भाकित वर्तवत आहेत . आता भाजपच्या (bjp) नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीसुद्धा महाविकास आघाडी सरकारबद्दल भाकित वर्तवलं आहे. महाविका आघाडी सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही.राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना सत्ता बदलाचे संकेत पंकजा मुंडे यांनी जाहीर भाषणातून दिले आहेत. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे, त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या विजयापासून होईल' असं भाकीत पंकजा मुंढे यांनी वर्तवलं आहे.
अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये आनंद आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौर्यावर आले आहेत. त्यामुळे बरं वाटायला लागलं आहे, असं म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीकाही पंकजा मुंडे यांनी केली.दरम्यान,'निवडणुक प्रचार सभेत 100 कोटी ची घोषणा केली पाच नगरपंचायतीला 500 कोटी आणणार असं विधान धनंजय मुंडे यांनी पाटोदा येथील जाहीर सभेत केलं होतं. या विधानाचा पंकजा मुंडे यांनी समाचार घेततला.
धनंजय मुंढे यांच्या बाबतीत बोलताना सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार आणि पालकमंत्री यांचं सुरू आहे. याला जेलमध्ये घालू त्याला जेल मध्ये घालू सगळ्याना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का? असा सवाल करत कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर टीकेचा भडीमार केला.
ओबीसी आरक्षणासंबंधी बोलताना 'धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर काहीच स्टेटमेंट नाही, कोणत्या तोंडाने लोकासमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, अस देखील यावेळी त्या म्हणाल्या.
ConversionConversion EmoticonEmoticon