जोवाड चक्रीवादळचा राज्याला धोका ;अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे होणार नुकसान, बळीराजा चिंतेत

                           (संग्रहित चित्र )

राज्यात जोवाड चक्रीवादळचा धोका, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता, शेतीपिकांचे नुकसान होण्याची भीती
मुंबई : राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. असे असताना आता जोवाड चक्रीवादळ धडकणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. एकीकडे अवकाळी पाऊस चालू तर दुसरीकडे जोवाड चक्रीवादळ धडकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वाढली.हिवाळ्याचे दिवस सुरु झाले असताना राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे.

चक्रीवादळ आणि हवामानातील झालेल्या बदलामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.आंध्र प्रदेश आणि ऑडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ असलेल्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असते. ही स्थिती 3 डिसेंबर पर्यंत अजून अधिक बळकट होण्याची शक्यता असून त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. त्यानंतर हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेला पुढे जाईल,असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Previous
Next Post »