डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे देशातील करोडो बहुजन समाजाची शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय प्रगती झाली.
परभणी : शहरातील नवजीवन कॉलनी येथील बलवान मित्रमंडळानी औरंगाबाद ते मुंबई, विमान प्रवास करून चैत्यभूमी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन.परतीचा प्रवास करून आज सकाळी रेल्वेने परभणी रेल्वे स्थानकावर आगम झाल्यावर नवजीवन नगरातील वैशाली महिला मंडळाच्या वतीने सर्वांचे हार घालून स्वागत करण्यात आले. यामध्ये बलवान मित्र मंडळाचे अध्यक्ष रवी वाघमारे, राहुल थिट्टे, पंजक मोरे, राहुल मोरे, कपिल मस्के, राहुल ढाले, सिद्धार्थ ढाले, बंडू पारवे, राजु गरुड, गजानन खुडे व मित्र मंडळाचे अन्य पदाधिकारी यांचा समावेश होता.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे देशाली करोडो बहुजन समाजाची शैक्षणिक आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रगती झाली.त्यांनी मिळवून दिलेल्या न्याय, हक्क आणि अधिकारामुळेच हे सर्व काही शक्य झालं आहे. आज बाबासाहेब आंबेडकर हे नाव देशाच्या केंद्रस्थानी असून देशाचं राजकारण बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशिवाय कोणालाही शक्य नाही. हे देशातील सर्वांना माहिती आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय लढ्यामुळेच आज समाजातील लोक अधिकारी झाले आमदार खासदार मंत्री झाले.आणि हे केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच.
आज हा लेख लिहिण्याचे कारण की लाखो आंबेडकर अनुयायी दरवर्षी विजयादशमीला दिक्षाभूमी आणि 6 डिसेंबरला चैत्याभूमी येथे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यास जात असतात. परंतु काही बिन पेंद्याचे लोटे असलेले लोक म्हणतात रेल्वेने फुकट जाणार समाज आहे. त्या बिन पेंद्याच्या लोट्यांना नवजीन कॉलनीतील बलवान मित्र मंडळाने दखवून दिले आहे की रेल्वेने फुकट नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विमानाने जाण्याची सुद्धा आमची अवकात आहे.कारण भीमा तुझ्यामुळे जन्माचे सोने झाले...कोणी कलेक्टर, आमदार, खासदार आणि मंत्री झाले..
तुझ्यामुळे जीवनाची प्रगती दिसूलागली..! तुझी लेकरं आज विमानात बसू लागली..!! बा भीमा तुम्हा कोटी कोटी नमन 🙏🙏.
ConversionConversion EmoticonEmoticon