महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे
औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांचा अर्धाकृती पुतळा विदयापीठ स्थापनेपासून बसविण्यात आलेला आहे. बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना शिक्षणाचे दारं खुली करून देणारे शिक्षण क्रांतीचे जनक आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेल्या तीन गुरु पैकी एक महात्मा ज्योतिबा फुले यांचा विद्यापीठात दर्शनी भागात असलेला अर्धाकृती पुतळा हटवून पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (आधीचे मराठवाडा विद्यापीठ) हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मध्येमातून स्थापन केलेल्या मिलिंद महाविद्यालयाचे विशाल अशा वटवृक्षात रूपांतर होऊन मराठवाद्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले.
शहीद स्मारक उभारण्याची मागणी
या शिक्षण संस्थेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली असल्यामुळे या विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावे यासाठी अनेक भीमसैनिकांनी आपले बलिदान देऊन शहीद झाले आहेत.त्या शहीद भीमसैनिकांच्या सन्मानार्थ विद्यापीठात शहीद स्मारक उभारण्याची मागणी करण्यात येत आहे.
सर्व पुतळ्यांची उंची व सजावट एकसारखीच असावी
विद्यापीठात बसविलेल्या बहुजन समाजातील सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यांची उंची व सजावट एकसारखीच असावी अशी मागणी करण्यात आली आहे. ज्यामुळे सर्व महापुरुषांचा सारखाच सन्मान होईल.
विद्यापीठातील सर्व वसतिगृह सुरु करण्यात यावीत
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठवाडा व मराठवाड्याबाहेरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. कोरोना काळात वसतिगृह बंद करण्यात आली होती. परंतु आता सर्व काही सुरळीत होत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी यासाठी सर्व वसतिगृह सुरु कसरण्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यापीठातील धार्मिक अतिक्रमण थांबविण्यात यावे
विद्यापीठ हे सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठीचं धर्मनिरपेक्ष विद्यापीठ आहे. विद्यापीठात सामाजिक शैक्षणिक व मानवी कल्याणासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांचे फोटो किंवा पुतळेचं विद्यापीठात असावीत. ज्यांचा शिक्षण क्षेत्राशी वास्तविक कोणताही संबंध नाही अशा लोकांना विद्यापीठात स्थान न देता त्यांचे धार्मिक अतिक्रमण थांबविण्यात यावे अशा प्रकारच्या मागण्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि पँथर सेना प्रमुख सतीश पट्टेकर यांनी उपकुलगुरू प्रमोद येवले यांना निवेदणाद्वारे करण्यात आल्या अहेत
To erect a full size statue of Mahatma Jyotiba Phule
A half-sized statue of Mahatma Jyotiba Phule has been installed at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University in Aurangabad since its inception. The Bahujan Republican Socialist Party has demanded that a half-sized statue of Mahatma Jyotiba Phule, the father of the education revolution and one of the three gurus considered by Dr. Babasaheb Ambedkar, be installed at the university.
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University (formerly Marathwada University) was established by Dr. Babasaheb Ambedkar in the middle of the People's Education
Society.
Demand for erection of martyr's memorial
Since this educational institution was established by Dr. Babasaheb Ambedkar, many Bhimsainiks have become martyrs by sacrificing their lives for the name of this university to be given to Dr. Babasaheb Ambedkar.
All statues should have the same height and decoration
It has been demanded that the height and decoration of the statues of all the great men of the Bahujan Samaj should be the same. So that all great men will be equally honored.
All hostels in the university should be started
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University students from Marathwada and outside Marathwada come to study. The hostel was closed during the Corona period. But now everything is going well. Therefore, it has been demanded that all hostels be started to accommodate the students coming from outside for education.
Religious encroachment in the university should be stopped
The University is a secular university for imparting knowledge to students of all castes and religions. The university should have photos or statues of great personalities who have contributed to social, educational and human welfare. Bahujan Republican Socialist Party's Aurangabad district president Arvind Kamble and Panther Sena chief Satish Pattekar have made similar demands to Vice-Chancellor Pramod Yeole to stop religious encroachments on people who have no real connection with the education sector.
ConversionConversion EmoticonEmoticon