महाराष्ट्रातील सर्व जिलह्यात बीआरएसपी स्थापना वर्धापन दिवस साजरा

महाराष्ट्रात सर्वत्र बीआरएसपी वर्धापन दिवस साजरा
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी (बीआरएसपी )या पक्षाचा सहावा स्थापना वर्धापन दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साजरा करण्यात आला आहे.नागपूर या ठिकाणी कस्तुर चंद पार्क मैदानावर मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिदिनी 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 2015 ला या दोन दिवशीय अधिवेशनात  ऍड डॉ सुरेश माने यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी या पक्षाची घोषणा केली.त्यामुळे 9 ऑक्टोबर ला मान्यवर कांशीरामजी यांचा स्मृतिदिन  आणि 10 ऑक्टोबर ला पक्षाचा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे.

ऍड. डॉ सुरेश माने हे कांशीरामजी यांच्या तालिमीत तयार झालेलं बुद्धिवादी, सामाजिक भान आणि राजकीय परिपक्वता व दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वात कमी कालावधीत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी दखल पात्र राजकीय पक्ष म्हणून ओळखत निर्माण केली आहे.कुठल्याही भावनिक मुद्याचा वापर करून पक्ष वाढला नसून जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर मोर्चे आंदोलने करून लोकांच्या मनात संघर्षशील पक्ष म्हणून स्थान मिळवल आहे.

सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास निर्माण करून संघटन उभा केलं. याच पक्ष संघटनच्या बळावर आज महाराष्ट्रात आंबेडकरी राजकीय पर्याय म्हणून डॉ माने यांच्या नेतृत्वात बीआरएसपीने ताकद निर्माण केली आहे. नोट बंदीची मागणी करणारा बी आर एस पी देशातील एकमेव पक्ष आहे. परंतुप्रधानमंत्री मोदींनी कुठली ही पूर्व तयारी न करता नोट बंदीकेल्यामुळे त्याचे उलट परिणाम सामान्य जनतेला सहन करावे लागले.

शेतकरी, कष्टकरी कामगारांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन लागू करण्याची मागणी वारंवार आंदोलन, मोर्च्याच्या मध्येमातून केली आहे .पेसा कायदा लागू करण्याची मागणी, वनवासी शब्दावर बंदी करण्याची मागणी, गायरान पट्टे वाटप करण्याची मागणी,टोल विरोधी आंदोलन,महागाईच्या विरोधात आंदोलन तसेच स्थानिक पातळीवर जनतेच्या विविध प्रश्नावर मोर्चे आंदोलन करून तसेच न्यायालयीन लढाई लढून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम बीआरएसपीने आज पर्यंत केलं  आहे.विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र,उत्तर महाराष्ट्र,मुंबई प्रदेश आणि मराठवाडा या विभागातील सर्वच जिल्हा तालुका स्तरावर मोठ्याप्रमाणात पक्ष सदस्यता नोंदणी अभियान राबवून व पक्ष प्रवेश सोहळे आयोजित करून कांशीरामजी स्मृतिदिन व पक्षाचा 6 वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे.

BRSP anniversary celebrations all over Maharashtra

 The sixth founding anniversary of the Bahujan Republican Socialist Party (BRSP) has been celebrated in every district of Maharashtra. Adv. The Socialist Party announced the party. Therefore, on October 9, Kanshi Ramji's Memorial Day and on October 10, the party's anniversary is celebrated.

 Adv. Dr. Suresh Mane is an intellectual, socially conscious and politically mature and far-sighted leader trained by Kanshi Ramji. Under his able leadership, in a short span of time, the Bahujan Republican Socialist Party has emerged as a recognizable political party in the political arena of Maharashtra.

 The organization was built by building trust in the minds of ordinary workers. Today, BRSP under the leadership of Dr. Mane has created strength as an Ambedkarite political alternative in Maharashtra on the strength of this party organization. The BRSP is the only party in the country to demand a ban on banknotes. But the general public had to bear the brunt of Prime Minister Modi's ban on banknotes without any prior preparation.

 Demands for monthly pension of Rs. To date, BRSP has worked to bring justice to the people by staging rallies on the issue as well as fighting court battles. Kanshi Ramji Memorial Day and the 6th anniversary of the party has been celebrated.
Previous
Next Post »