जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत अकोल्यात वंचितचा झेंडा

वंचित बहुजन आघाडीने सर्वच राजकीय पक्षांना दिली धोबी पच्छाड
राज्यातील सहा जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागा साठी झालेल्या पोटनिवडणुकीत काल 6 ऑक्टोबर रोजी निकाल लागला. त्यात अकोला जिल्ह्यात जिल्हापरिषदेच्या चौदा जागा साठी झालेल्या पोटनवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक सहा जागा जिंकत बाजीमारली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडी  भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये मुख्य लढत होती.

महाविकास आघाडीतील सेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपला धूळ चारत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक 6 जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवलं आहे.वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक सर्वसामान्य स्थानिक कार्यकर्त्यांच्या जिवावर लढवली होती. यात पक्षाला आपल वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळालं आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अकोला जिल्हापरिषद मध्ये वंचित बहुजन आघाडीने झेंडा फडकवल्यामुळे कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

सर्वसामान्यांचा विजय झाला असल्यामुळे अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यात नवचैतन्य पसरलं आहे.विशेष बाब म्हणजे सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन पक्ष आणि भाजप या चार पक्षांसोब लढत देत वंचित बहुजन आघाडीने सर्वाधिक जागा जिंकून विजय संपादन केला आहे.
अकोल्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते पाहूयात:
एकूण जागा 14
वंचित बहुजन आघाडी -06
अपक्ष                       -02
राष्ट्रवादी                    -02
शिवसेना                    -01
काँग्रेस                       -01
भाजप                       -01
प्रहार                         -01

Deprived Bahujan Alliance gave Dhobi Pachhad to all political parties

 The by-polls for 85 Zilla Parishad and 144 Panchayat Samiti seats in six districts of the state were held on October 6.  In the by-elections held for 14 Zilla Parishad seats in Akola district, the deprived Bahujan Alliance has won the highest number of six seats.  The main battle in this election was between the ruling Mahavikas Aghadi BJP and the deprived Bahujan Aghadi.


 The three parties, the Sena NCP and the Congress in the Mahavikas Alliance, and the BJP, the main opposition party in the state, have been dominated by the Deprived Bahujan Alliance, which has won the highest number of six seats.  In this, the party has succeeded in maintaining its dominance.  In Akola Zilla Parishad, which has attracted the attention of all, the flag is being hoisted by the deprived Bahujan Alliance, which is creating an atmosphere of happiness among the workers.

 The victory of the common man has given a new impetus to the party workers in Akola district.

 Let's see which party got how many seats in Akola:

 Total seats 14:

 Deprived Bahujan Aghadi-06

 Independent-02

 Nationalist-02

 Shiv Sena-01

 Congress-01

 BJP-01

 Prahar-01
Previous
Next Post »