रेल्वे रुळावर आढळला छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृत देह; एकजण जखमी, लुटारू पसार
डोंबिवलीत एक धक्का दायक घटना घडली आहे. रिक्षा अडवून रिक्षामधील दोन प्रवाशांना बाहेर ओढून त्यांना बेदम मारहाण करत एकाचा गळा कापण्यात आला आहे. यातील एक जन मारहाणीत बेशुद्ध पडला होता. बेशुद्ध पडलेला व्यक्ती मेला आहे असं समजून त्यांच्या जवळील सर्व पैसे घेऊन लुटारू पसार झाले.ही धक्कादायक घटना डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात घडली आहे.
या घटनेत जीव वाचलेल्या प्रवाशाने घटनेची माहिती सांगितल्याने सदरील घटना घडल्याचे उघड झाले आहे.प्रवाशाने दिलेल्या माहिती वरून शहर पोलीस आणि रेल्वे पोलीस या प्रकरणाचा तपास करत अहेत.परंतु डोंबिवलीतील मुख्य रस्ता समजल्या जाणाऱ्या या रस्त्यावर घडलेल्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
शहरातील कल्याण आणि डोंबिवलीला जोडणारा नाईन्टी फीट रस्ता हा गुन्हेगारांचा अड्डा बनला असल्याचे नागरिक सांगतात. दिवसा प्रेमी जोडपे आणि रात्रीच्या समयी नशा करणाऱ्या युवकांचा वावर मोठ्याप्रमात असतो.डोंबिवलीशहरातील शेलारनाका परिसरात बेचरप्रसाद चौहान आणि बबलू चौहान राहात असून ते फर्निचरचा व्यवसाय करतात.हे दोघे मूळचे उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील रहिवाशी असून ते दोघे गावी जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनला रिक्षाने जात होते.
रिक्षा खंबाळपाडा परिसरात पोहचली असता काही लोकांनी रिक्षा थांबवून रिक्षातील या दोघांना बाहेर ओढून रेल्वे पटरी कडे नेऊन बेदम मारहाण करत एकाचा गळा कापला. दुसरा एकजण जखमी अवस्थेत झाडा झूडपात पडला होता.जखमी अवस्थेत पडलेला मेला आहे असं समजून त्या दोघांकडील रोकड घेऊन लुटारू पसार झाले. दरम्यान या दोघांकडील बॅग आणि मोबाईल रेल्वे पटरीच्या बाजूला पडल्याचे दिसून आले आहे.
याची माहिती या भयानक घटनेतून जीव वाचेलेला बबलू सकाळी तो राहात असलेल्या परिसरात आला आणि घडलेल्या घटनेची माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांना सांगितली. तेव्हा कांबळे यांनी जखमी बबलू चौहानला टिळक नगर पोलीस स्टेशनला नेऊन घटनेची माहिती दिली. घटना कुठे घडली हे पाण्यासाठी शशिकांत कांबळे आणि बबलू चौहान त्याठिकाणी गेले. बबलूला त्याचा साथीदार जिवंत आहे कि मेला आहे हे देखील माहिती नव्हते.घटना स्थळी गेल्यानंतर बेचारप्रसाद चौहान चा मृत देह छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडलेला आढळून आला आहे.
सदरील घटना लुटीच्या इराद्याने घडली असावी असा प्राथमिक अंजाज व्यक्त केला जात आहे. घटनेची सत्यात नेमकी काय आहे याचा अधिक तपास पोलीस करत अहेत.परंतु कल्याण-डोंबिवली शहरात घडलेल्या लूटमारीच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रात्रीच्या वेळी नागरिकांनी बाहेर कसे पडावे असा प्रश्न कल्याण -डोंबिवली परिसरातील नागरिकांन पडला आहे.
Dead body found on railway tracks; One wounded, the robber passed
A shocking incident has taken place in Dombivali. Two passengers of the rickshaw were pulled out and one of them was strangled. One of them was knocked unconscious. Assuming that the unconscious person was dead, the robbers took all the money from them and passed out. This shocking incident has taken place in Thakurli area of Dombivali.
The incident was reported by a passenger who survived the incident. The city police and railway police are investigating the incident based on the information provided by the passenger.
Citizens say that the 90-foot road connecting Kalyan and Dombivali in the city has become a den of criminals. Bechar Prasad Chauhan and Bablu Chauhan live in the Shelarnaka area of Dombivali and run a furniture business. Both are natives of Siddharthnagar district in Uttar Pradesh and were traveling by rickshaw to Kalyan railway station to reach the village.
When the rickshaw reached Khambalpada area, some people stopped the rickshaw, pulled the two out of the rickshaw, took them to the railway tracks, beat one of them and cut his throat. Another was injured when a tree fell on him. Meanwhile, the bags and mobile phones of the two were found lying on the side of the railway track.
Bablu, who survived the horrific incident, came to the area where he was staying in the morning and informed BJP district president Shashikant Kamble about the incident. Kamble then took the injured Bablu Chauhan to Tilak Nagar police station and informed him about the incident. Shashikant Kamble and Bablu Chauhan went to the spot to fetch water. Bablu did not even know if his companion was alive or dead.
Preliminary speculation is that the incident may have been committed with the intention of looting. Police are investigating further into the incident. However, the incident of looting in Kalyan-Dombivali has created an atmosphere of fear among the citizens of the area.
ConversionConversion EmoticonEmoticon