967साखरकामगार बारा वर्षांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील कन्नड सहकारी साखर कारखाना रोहित पवार यांनी विकत घेऊन बारामती ऍग्रो सहकारी साखर कारखाना असं नामकरण करण्यात आलं आहे. या साखर कारखान्यात काम करत असलेल्या 250 कामगारांचा मृत्यू झाला असून 967 कामगार मागील बारा वर्षांपासून हक्काच्या वेतनापासून वंचित अहेत.शेकडो कोटींचा कारखाना कवडीमोल भावात विकत घेऊन कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून शंभर कोटीचं तारण कर्ज घेतलं आहे.कारखान्याच्या जमिनीतून रस्ता गेल्याने त्याचेही करोडो रुपये रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो ला आजीत पवार यांनी मिळवून दिले अहेत.
बँकेचे संचालक आजीत पवार आणि बँकेचे व बारामती ऍग्रो चे मालक रोहित पवार यांनी आर्थिक लाभ घेऊन भ्रष्टाचार केला आहे.सत्तेचा गैरवापर करून पवार कुटुंबीय तुपाशी आणि ज्या कामगारांनी रक्त अटवून घामगाळून कारखाना उभा करून मोठा केला ते मात्र उपाशी असा आरोप पँथर सेना प्रमुख सतीश पट्टेकर व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे यांनी केला आहे.
माननीय उच्चन्यायालयाने दोन वेळा आदेश दिले अहेत कामगार आयुक्त आणि साखर आयुक्त यांनी सुद्धा आदेश देऊन आता पर्यंत कामगारांना वेतन देण्यात येत नाही. कारखान्यातील 967 कामगार बारावर्षांपासून थांबलेले वेतन मिळविण्यासाठी लढा देत अहेत.कामगारांना हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवण्यास सर्वस्वी पवार कुटुंब जबाबदार असल्याचे कामगारानी म्हटलं आहे.
मागील बारा वर्षांपासून वेतनापासून वंचित 967 कामगारांना त्यांच्या हक्काचे वेतन मिळवून देण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळे आणि पँथर सेना प्रमुख सतीश पट्टेकर मागील अनेक दिवसापासून निवेदने व आंदोलनाच्या मध्येमातून शासकीय पातळीवर लढा देत अहेत. या कामगारांना न्याय मिळे पर्यंत हा लढा लढणार असल्याचे अरविंद कांबळे आणि सतीश पट्टेकर यांनी म्हटलं आहे.
967 sugar workers waiting for wages for twelve years
Kannada Co-operative Sugar Factory in Kannad taluka of Aurangabad district has been purchased by Rohit Pawar and renamed as Baramati Agro Co-operative Sugar Factory. 250 workers of this sugar factory have died and 967 workers have been deprived of their rightful wages for last 12 years. Baramati Agro has been acquired by Ajit Pawar.
Ajit Pawar, director of the bank, and Rohit Pawar, owner of the bank and Baramati Agro, have been involved in corruption for financial gain. Republican Socialist Party District President Arvind Kamble has done it.
The Hon'ble High Court has twice ordered that the Labor Commissioner and the Sugar Commissioner also order that the workers are not being paid till now. The workers have said that the entire Pawar family is responsible for depriving the workers of their rightful wages.
Bahujan Republican Socialist Party district president Arvind Kamble and Panther Sena chief Satish Pattekar have been fighting at the government level for the last 12 days to get their rightful wages. Arvind Kamble and Satish Pattekar have said that they will fight till these workers get justice.
1 comments:
Click here for commentsधन्यवाद सरजी
ConversionConversion EmoticonEmoticon