पंजाब काँग्रेसला गटबाजीचा फटका ;पंजाब काँग्रेसमध्ये अस्थिरता

पंजाब काँग्रेसला गटबाजीचा फटका, पंजाब काँग्रेस मध्ये अस्थिरता
कॅप्टन आमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर चरणजित सिंह चन्नी हे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर चन्नी यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले अहेत. मंत्रिमंडळातील फेरबदला नंतर लगेचच प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी राजीनामा दिला.त्या नंतर आणखी दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले अहेत. आमरिंदर सिंग व नवज्योत सिद्धू यांच्यातील गटबाजी मुळे आमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता चरणजित सिंह चन्नी मुख्यमंत्री झाले तर नवज्योत सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर सिद्धू यांच्या समर्थक मंत्र्यांनी राजीनामे दिले अहेत.

नवज्योत सिंग सिद्धू यांना नेमकं काय हवं आहे
नवज्योत सिद्धू यांच्या मर्जीप्रमाणे मंत्रिमंडळात फेरबदल करायला पाहिजे होता का. जर प्रत्येक नेत्याच्या मर्जीनुसार पक्ष चालवायचा असेल तर तो पक्ष राहणार नसून खेळण्यातील बाहुलं होईल. पक्षात कोणावरही नियंत्रण असणार नाही. पक्षातील नेत्यांना पक्ष श्रेष्टीचा धाक राहणार नाही.असाच प्रकार पंजाबमध्ये सध्या काँग्रेस पक्षात पहायला मिळत आहे.नवज्योत सिद्धू  यांचा उद्देश पंजाब काँग्रेसला कमजोर करण्याचा आहे का? कारण नवज्योत सिद्धू यांच्या दबावामुळे आमरिंदर सिंग यांना राजीनामा देण्यास भागपडल होतं. आता स्वतःच प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे व सोबत समर्थक मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले अहेत.

चरणजित सिंह चन्नी मुख्यमंत्री झाल्याचे सिद्धू यांना मान्य नाही का?
चरणजित सिंह चन्नी अनुसूचित जातीचे असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास सिद्धू यांना अडचण आहे का? जर असं असेल तर सिद्धू हे जातीवाद निर्माण करतात का असाही प्रश्न निर्माण होतो. जर हे नसेल तर प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला आहे. पंजाब काँग्रेसला स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न सिद्धू करत अहेत असं दिसत आहे.पंजाब काँग्रेस ला अस्थिर करून पक्षवार ताबा मिळवायचा आहे का अशा अनेक शंका निर्माण होतात. साध्यची पंजाब काँग्रेस मधील अस्थिरता नवज्योत सिद्धू मुळेच निर्माण झाली आहे.
आमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांना 'अस्थिर व्यक्ती' म्हटल्याचं खरं ठरतंय का?
आमरिंदर सिंग यांना सिद्धू यांच्या दबाव गटामुळे राजीनामा द्यावा लागला त्यावेळी त्यांनी नवज्योत सिद्धू यांच्यावर आरोप केला होता कि सिद्धू हे अस्थिर व्यक्ती आहे.काल झालेल्या पंजाब काँग्रेस मधील राजीनामा घडामोडीमुळे आमरिंदर सिंग यांचा आरोप खरा ठरताना दिसत आहे. काँग्रेस पक्षश्रेष्टीने यावर योग्य निर्णय घेतला नाही तर पंजाबमधील काँग्रेस कमजोर होऊन येणाऱ्या निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे सिद्धू सारख्या अस्थिर व्यक्तीला वेळीच लगाम घालून स्थिर करण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागेल.

Punjab Congress hit by factionalism, instability in Punjab Congress

 Charanjit Singh Channy became the Chief Minister after the resignation of Capt. Amarinder Singh.  Channy's cabinet has since been reshuffled.  Immediately after the cabinet reshuffle, state Congress president Navjot Sidhu resigned. Two other ministers have since resigned.  Due to factionalism between Amarinder Singh and Navjot Sidhu, Amarinder Singh had to resign as Chief Minister.  Now Charanjit Singh Channi has become the Chief Minister while Navjot Sidhu has resigned.  Since then, Sidhu's supporters have resigned.

 What exactly does Navjot Singh Sidhu want?

 Whether the cabinet should have been reshuffled as per the wishes of Navjot Sidhu.  If every leader wants to run the party as he pleases, he will not be a party but a puppet.  The party will have no control over anyone.  Party leaders will not be afraid of party supremacy. The same is happening in Punjab at present. Is Navjot Sidhu's intention to weaken Punjab Congress?  Because of the pressure of Navjot Sidhu, Amarinder Singh was forced to resign.  Now the state president himself has resigned and along with him the supporting ministers have also resigned.

Doesn't Sidhu agree that Charanjit Singh Channi has become the Chief Minister?

 Since Charanjit Singh Channi is a Scheduled Caste, does Sidhu have any difficulty in working under his leadership?  If so, then the question arises as to whether Sidhu creates casteism.  If not here's a new product just for you!  It seems that they are trying to run the Punjab Congress as per their whims and fancies.  Sadhya's instability in the Punjab Congress is due to Navjot Sidhu.

 Is it true that Amarinder Singh called Sidhu an 'unstable person'?
 At the time when Amarinder Singh had to resign due to Sidhu's pressure group, he had accused Navjot Sidhu that Sidhu was an unstable person.  If the Congress party does not take the right decision on this, the Congress in Punjab will be weakened and it will be hit hard in the coming elections.  Therefore, the Congress will have to try to stabilize an unstable person like Sidhu in time.
Previous
Next Post »