जगात व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा देश म्हणजे भारत
भारत देश हा जगातील एकमेव देश आहे जिथे व्यक्ती स्वातंत्र्य सर्वात जास्त आहे. भारतीय संविधानाने देशात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याचा अधिकार दिला आहे. धार्मिक विधी बोलीभाषा, पोशाख कोणता परिधान करायचा खानपान या सर्व गोष्टीचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना आहे. त्यामुळेच तर भारतात अनेक धर्म पंथ जाती असून सुद्धा राष्ट्रीय एकात्मता टिकून आहे. इथे बोलण्यावर बंदी नाही कपडे कोणते घालावे यावर बंदी नाही दाढी कशी ठेवायची डोक्यावरील केस कसे ठेवायचे यावर कुठलीच बंदी नाही. मुलींच्या शिक्षणावर बंदी नाही महिलांना नौकरी करण्याची बंदी नाही.
उलट मुलींच्या शिक्षणावर जास्त भर दिला जातो त्यासाठी वेगवेगळ्या सोयी सवलती सरकारकडून दिल्या जातात. महिलांना राजकारणात व नौकरी मध्ये 33 टक्के आरक्षण आहे.अनेक क्षेत्रात 50 टक्क्यापर्यंत महिलांना संधी दिली जात आहे. भारतात प्रशासकीय पातळीवर नागरिकात भेदभाव करण्याचे कोणतेच आदेश दिले जात नाहीत.फुलांची बाग जशी विविध रंगामुळे सुंदर दिसते तसेच भारत देश विविध धर्म पंथ आणि संस्कृती यामुळे सोभून दिसतो. याच एकमेव कारण म्हणजे भारतात असलेली धार्मिक विविधता. प्रत्येक धर्माचे वेगवेगळे सण त्यात इतर धर्माच्या नागरिकांनी घेतलेला सहभाग या मुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकून राहण्यास मदत होते. हे सर्व काही शक्य झालं ते भारतीय संविधानामुळे.संविधानामुळेच विविधते मध्ये एकता टिकून आहे.
ज्या देशात एकाच धर्माचे लोक राहात तिथे सर्व काही मनमानी असते आणि तिथे धार्मिक कट्टरपंथी पणा जास्त दिसून येतो.धर्माच्या नावाखाली तिथल्या माणसांना व्यक्ती स्वातंत्र्य नसते. मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य नसते महिलांना नौकरी करण्याचे स्वातंत्र्य नसते. धार्मिक कट्टरपंथी राष्ट्रात नागरिकांनी कसे कपडे घालावे दाढी ठेवावी कि नाही ठेवावी डोक्यावर केश ठेवावे कि नाही ठेवावे हे सरकार कडून सांगितल्या जाते. सध्या अफगाणिस्तान ची परिस्थिती अशीच आहे. अफगाणिस्तान वर तालीबानी सत्ता आल्यानंतर तिथल्या नागरिकांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले अहेत.
तालीबानी हे कट्टरपंथी मुस्लिम धर्मी असल्यामुळे त्यांनी महिलांनी कोणते कपडे घालावेहे ठरवून दिलं आहे. मुलींना शिक्षण नको महिलांना नौकरी करण्याची परवानगी नाही त्यांना राजकीय प्रतिनिधीत्व करण्याची मुभा नाही. असे अफगाणिस्तानच्या तालीबानी सरकारचे नियम अहेत. तालीबानी सरकारचा आणखी एक कहर पाहायला मिळतो तो म्हणजे पुरुषांनी दाढी काढायची नाही.धाडी कमी करायची नाही. असं कोणी केल्यास शिक्षा भोगावी लागणार आहे. केसकर्तन करणाऱ्याला सुद्धा शिक्षा मिळणार आहे.
यामुळे तिथल्या नागरिकात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.तिथे व्यक्ती स्वातंत्र्य अजिबात नाही. म्हणून तर लाखो लोक अफगाणिस्तान सोडून जान्यासाठी धडपड करत अहेत. तिथे धर्माच्या नावाखाली नागरिकांवर अत्याचार केले जातात. कट्टरपंथी राज्याकर्त्यांना तिथली माणसं महत्वाचे वाटत नसून फक्त धर्म महत्वाचा वाटतो.
म्हणून तर भारत देश हा सर्वात जास्त व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारं जगातील एकमेव राष्ट आहे.आणि हे सर्व शक्य आहे ते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.
India is the world's leading advocate of individual freedom
India is the only country in the world where individual freedom is highest. The Constitution of India gives the right to every caste and religion living in the country to behave according to their own religion. Indian citizens have the freedom to perform rituals, dialects, dress and food. That is why national unity has been maintained in India despite the existence of many religions and castes. There is no ban on speaking, no ban on what to wear, no ban on how to keep a beard, no ban on how to keep hair on the head. No ban on girls' education, no ban on women getting jobs.
On the contrary, for the emphasis on girls' education, various facilities are provided by the government. Women have 33 per cent reservation in politics and jobs. In many areas, women are being given opportunities up to 50 per cent. In India, there are no orders to discriminate against citizens at the administrative level. The only reason for this is the religious diversity in India. Different festivals of each religion and participation of citizens of other religions in it helps in maintaining the national unity of the country. All this is possible because of the Constitution of India. It is because of the Constitution that unity in diversity is maintained.
In a country where people of the same religion live, everything is arbitrary and religious fanaticism is more prevalent. People do not have individual freedom in the name of religion. Girls do not have freedom of education Women do not have freedom of employment. In a religiously extremist nation, the government dictates how to dress, whether to wear a beard, or to wear hair. This is the current situation in Afghanistan. Many restrictions have been imposed on Afghan civilians since the Taliban came to power.
Since the Taliban are radical Muslims, they have decided what women should wear. Girls don't want education Women are not allowed to work They are not allowed to represent politics. Such are the rules of the Taliban government in Afghanistan. Another scourge of the Taliban government is that men do not want to shave. Anyone who does so will be punished. The one who cuts the hair will also be punished.
This has created an atmosphere of fear among the citizens. There is no freedom of the individual. So millions of people are struggling to leave Afghanistan. Citizens are oppressed in the name of religion. Radical rulers do not think the people are important, only religion.
Therefore, India is the only nation in the world that has the highest number of individual freedoms. And all this is possible only because of the constitution written by Dr. Babasaheb Ambedkar, which all Indians are proud of.
ConversionConversion EmoticonEmoticon