अंधश्रद्धा ज्याच्या घरी तिथे चाले बुवा बाबांची भोंदूगिरी
आपल्या देशात अनेक धर्म पंथ आणि जाती आहेत आहेत.प्रत्येकाच्या धर्मानुसार धार्मिक स्थळंही वेगवेगळे आहेत.या व्यतिरिक्त आणखी एक अंधश्रद्धा नावाची जात या भारतात आहे.अंधश्रद्धा नावाची जात भारतात अतीप्रमाणात पाहायला मिळते. आज इथे लिहिण्याचा उद्देश असा आहे की मागील काही दिवसापासून बाळू मामाचा वंशज म्हणून फसवणूक करणाऱ्या मनोहर भोसलेचं प्रकरण गाजत आहे.या मनोहर भोसले नावाच्या व्यक्तीने बाळू मामाचा वंशज आहे. मी बाळू मामाचा वंशज असल्यामुळे बाळू मामाची दैवी शक्ती माझ्यात आहे.अशा भावनेने समाजात प्रचार आणि प्रसार सुरु केला.अंधश्रध्येचे बळी पडलेले भोळे भाबडे लोक त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. त्याचाच फायदा घेत या मनोहर भोसले नावाच्या व्यक्तीने अनेक लोकांकडून लाखो रुपये लाटले.
बारामतीतील शशिकांत खरात नावाच्या 23 वर्षीय युवकाने मनोहर भोसलेच्या विरोधात तक्रार दिली असून तक्रारीत फिर्यादीने म्हटलं आहे की वडिलांच्या गळ्यातील कर्क रोग बरा करतो म्हणून अडीच लाख रुपये मनोहर भोसले व त्याच्या साथीदाराने संगण मत करून लुटले.अशा अनेक तक्रारी या मनोहर भोसलेच्या विरोधात आल्या आहेत.अशा प्रकारे अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे बुवा बाबा साधू संताचा सुळसुळाट फक्त भारतात पहायला मिळतो. अंधश्रद्धा नावाच्या जातीवर हजारो बुवाबाबा जगतात. कोट्यावधीची धनसंपत्ती कमावतात. हजारो एकर जमिनी त्यांच्याकडे असतात. हे सर्व कुणामुळे तर अंधश्रद्धा नावाच्या जातीमुळे.अंधश्रद्धा हे भोंदू लोकांचं उत्पन्नाचं देशातील सर्वात मोठ साधन आहे.
या जातीत खूप मोठा शिकलेला वर्ग आहे. डॉक्टर इंजिनीर वकील प्राध्यापक शिक्षक राजकीय मंडळी न्यायलायचे न्यायाधीश.पार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पर्यंत सर्वच अंधश्रध्येच्या या पंगतीत बसलेले दिसतात.त्याचा फायदा बुवाबाबा यांना होते. बुवा बाबा म्हणजे कोण? ज्यांना नौकरी मिळवता येत नाही. ज्यांना घरी कोणी विचारत नाही ज्यांच्यात काही करून दाखवण्याची लायकी नाही असे लोक बुवा बाबा बनतात. त्यांना एक गोष्ट मात्र नक्की माहिती आहे. ती म्हणजे झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये. भारतासारख्या देशात तर हे सहज शक्य आहे.म्हणून हा बिनाभांडवली उद्योग अंध भक्ताच्या जिवावर सुरु करतात. अल्पवाधित ठीक ठिकाणी देवी देवतांची मंदिरं उभारली जातात.हजारो एकर जमिनीवर बुवाबाबांचे आश्रम मठ बांधले जातात.
अंधश्रध्येच्या जातीचे लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी या बुवाबाबांचे अनुयायी बनतात. घरातील वादविवाद आर्थिक अडचण मुलाना नौकरी मिळविण्यापासून ते चक्क एखाद्याला मुल होण्यापर्यंतच्या सर्व समस्या बुवाबाबाच सोडवतात.अशा प्रकारचे भक्त असल्यास भोंदू बाबांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही. खाणं पिणं पैसा आणि शरीर सुखाची सर्व सोय भक्तांकडून बाबासाठी केली जाते. म्हणून तर आसाराम बापू,रामरहीम अनेक कुठल्या कुठल्या मठाचे महंत साधूच्या सत्संगाने अनेक भक्तांचे कल्याण झाल्यामुळे आज ही मंडळी जेलची हवा खात आहेत. तरीही मनोहर भोसले सारखे अनेक भोंदू बाबा महाराज बघायला मिळत आहेत.
Superstition in whose house there is the hypocrisy of Buwa Baba
There are many religions, sects and castes in our country. Religious places are different according to each religion. Apart from this, there is another caste called Andhashraddha in India. A caste called Andhashraddha is very common in India. The purpose of writing here today is that the case of Manohar Bhosale, who has been cheating as a descendant of Balu Mama for the last few days, is being heard. This person named Manohar Bhosale is a descendant of Balu Mama. Since I am a descendant of Balu Mama, the divine power of Balu Mama is in me. Taking advantage of this, a man named Manohar Bhosale stole lakhs of rupees from many people.
A 23-year-old man named Shashikant Kharat from Baramati has lodged a complaint against Manohar Bhosale alleging that his father cured cancer of his father's neck. There are more people who fall victim to superstition. Therefore, the prosperity of Buwa Baba Sadhu Sant can be seen only in India. Thousands of parents live on a caste called superstition. They make billions. They have thousands of acres of land. All this is due to someone and a caste called superstition. Superstition is the biggest source of income for fake people in the country.
This caste has a very large learned class. Doctors, Engineers, Lawyers, Professors, Teachers, Judges to judge the political establishment. Everyone from the Supreme Court to the Supreme Court seems to be sitting in this line of superstition. It benefits Buwababa. Who is Buwa Baba? Who can't get a job. People who are not asked at home, who do not deserve to do anything, become grandparents. One thing they do know. She is the one who bends, the world should bend. In a country like India, this is easily possible. Temples of gods and goddesses are erected in the short term. Buwababa's Ashram Math is built on thousands of acres of land.
Superstitious people follow these parents to solve their problems. Debates in the home, financial problems, all the problems from getting a job to a child to having a child are solved by the parents themselves. Eating, drinking, money and all the comforts of body are provided by the devotees for Baba. So, Asaram Bapu, Ramrahim, the satsang of a mahant sadhu of some of the monasteries has benefited many devotees, so today these congregations are eating the air of jail. Even so, many hypocrites like Manohar Bhosale are getting to see Baba Maharaj.
ConversionConversion EmoticonEmoticon