काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात शाब्दिक चकमक :
सध्या महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध सुरु झाले असून राज्यात चर्चेला उधाण आले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन महत्वाचे पक्ष आहेत.परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष नेहमी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असताना आपण पहात आहोत. तुझं माझं जमेना पण तुझ्याविना सरकार चालेना अशी महाविकास आघाडी सरकारची सध्याची परिस्थिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'काँग्रेस नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी' झाली असल्याचा टोला मारला होता.शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. काँग्रेसचे खच्ची करण केल्याजात आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील शरद पवारांना प्रतिउत्तर दिले आहे. नाना पटोले म्हणतात काँग्रेसने ज्यांना पॉवर दिली जमीन राखायला दिली त्यांनीच विश्वास घात केला. राखायला दिलेली जमिनच चोरली. यावरून दोन्ही काँग्रेस मध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे.
शरद पवार हे अनुभवी आणि मुरबी राजकारणी आहेत. सध्या देशातील काँग्रेसची झालेली पडझड आणि कणखर नेतृवाचा अभाव यामुळे देशातील एक नंबरचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसची अवस्था पाहून शरद पवारांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं असावं. तसही शरद पवार राजकीय गुगली टाकण्यात माहीर आहेतच. आपल्याकडे हिंदी म्हण आहे. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिये. तसच राजकारणात सुद्धा एकमेकांना दाबण्याचा प्रयत्न करून पहिला जातो. तसाच प्रयत्न काँग्रेस ला दाबण्यासाठी शरद पवार करत असावेत.
शरद पवार मुळचे काँग्रेसचेच परंतु राजकीय आकांक्षापोटी सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून काँग्रेस मधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.राजकारणात प्रत्यकाला राजकीय स्वार्थ असतो त्यात काही गैर नाही. परंतु काँग्रेस मध्ये राहून अनेक वर्ष सत्तेचा उपभोग घेतलेल्या शरद पवारांनी काँग्रेस बद्दल केलेलं विधान काँग्रेस वाल्यांच्या चांगलच जिव्हारी लागलं आहे.त्यामुळे नाना पटोले यांनी ज्यांना जमीन राखायला दिली त्यांनीच विश्वास घात केला आणि जमीन चोरली असा आरोप अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर केला आहे.यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात वाकयुद्ध सुरु झालं असून राज्यात चर्चेला उधाण आलं आहे.
Verbal clash between Congress and NCP:
Currently, a war of words has broken out between the Congress and the NCP in Maharashtra and discussions are in full swing in the state. The Congress and the NCP are the two most important parties in the Mahavikas Aghadi government in the state. The present situation of the Mahavikas Aghadi government is such that the government will not function without you.
NCP president Sharad Pawar had lashed out at the Congress saying that it was like a landlord of a dilapidated mansion. The Congress is being crushed. Therefore, there is resentment in the Congress in the state. Maharashtra state president Nana Patole has also responded to Sharad Pawar. Nana Patole says those who were given power by the Congress to keep the land were betrayed. He stole the land he was supposed to keep. This has led to a literal clash in both the Congress parties.
Sharad Pawar is an experienced politician. Sharad Pawar may have made such a statement seeing the current state of the Congress, which is the number one national party in the country due to the decline of the Congress and the lack of strong leadership. Even so, Sharad Pawar is good at throwing political googly. We have a Hindi saying. The world that bends should bend. The same goes for politics, trying to suppress each other. Sharad Pawar must be making similar efforts to suppress the Congress.
Sharad Pawar was originally from the Congress but for political aspirations he left the Congress on Sonia Gandhi's foreign policy and formed the NCP. There is nothing wrong with everyone having a political interest in politics. However, the statement made by Sharad Pawar, who has been in power for many years, has been well received by the Congress leaders. The war of words has started and the discussion in the state is in full swing.
ConversionConversion EmoticonEmoticon