पूणे महानगरपालिकेने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा केला अवमान ;साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान असा लावला फलक

 पुणे महानगरपालिकेचा प्रताप :
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे पुणे महानगरपालिकेने साध्वी सावित्रीबाई फुले उद्यान असा फलक लावून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा अवमान केला आहे. पुणे महानगरपालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. आरएसएस-भाजपच्या सडक्या मेंदूतून ही कल्पना आलेली आहे. जाणूनबुजून हा खोडसाळपणा केला असून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाची विटंबना केली आहे. उद्यानाला नाव देण्याचा ठराव महानगरपालिकेने घेतला आहे. त्यात सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे साध्वी नाव लावण्याची सूचना कोणी केली आणि अशा नावाला अनुमती कोणी आणि कशी काय दिली.याला सर्वस्वी जबाबदार पुणे महानगरपालिका आहे.याची चौकशी झाली पाहिजे.

ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगडगोटे चिखल व शेण अंगावर झेलून पुण्यातील भिडे वाड्यात 1848ला स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सर्व जाती धर्मातील स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुले केली. अशा क्रांती ज्योतीला साध्वी नाव लावून त्यांच्या कार्याला पुसून टाकण्याचं कटकरस्थान मनुवादी मानसिकतेच्या सडक्या मेंदूने केलं आहे.साध्वी नाव लावून हिंदुत्विकरण करण्याच षडयंत्र केल्या जात आहे.ज्या ज्ञानज्योती सावित्रीबाई मुळे शिक्षण घेऊन आज महिला शिक्षक, डॉक्टर वकील न्यायाधीश झाल्या. मंत्री,मुख्यमंत्री प्रधानमंत्री व राष्ट्रअध्यक्ष झाल्या ते फक्त शिक्षणाच्या क्रांत्रीने.

साध्वीनी कोणती क्रांती केली आहे. साध्वी फक्त मठ उभारून महिलांना धर्माच्या नावाने गुलाम करून मठात दासी बनवण्याचं काम साध्वी करतात.साध्वीच्या कर्तृत्वाने कोणती देश क्रांत्री झाली. असा कोणताच इतिहास नाही.स्त्रियांना धर्माच्या नावाने गुलाम बनवून कोट्यावधीची धन संपत्ती मिळविण्याचं काम केलं आहे. साध्वी म्हणजे नाकर्ते पणाचं प्रतीक आहे. असं हिंदुत्ववादी नाकर्तेपणाचं प्रतीक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे लावून त्यांच कार्य पुसून टाकण्याचा हा कुटील डाव मनुवादी करत अहेत.

बहुजन समाजातील महापुरुषांचा क्रांतिकारी इतिहास नष्ट करून त्याचं हिंदुत्विकरण केल्या जात आहे. ज्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे शौर्य नाही किंवा क्रांतिकारी इतिहास नाही ते षंडलोक दुसऱ्याच्या शौर्य व पराक्रमचा इतिहास पुसून टाकण्यासाठी अशा प्रकारचे षडयंत्र रचतात.पुण्यातील समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढील साध्वी हे नाव पुसून टाकले असून पुणे महानगरपालिका प्रशासनास संबंधीतावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.बहुजन समाजातील अनेक संघटनानी या घटनेचा निषेध केला असून पुणे महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.

Pratap of Pune Municipal Corporation:

 Dnyanjyoti Savitribai Phule has been insulted by the Pune Municipal Corporation by putting up a sign saying 'Sadhvi Savitribai Phule Udyan' next to her name.  BJP is currently in power in Pune Municipal Corporation.  The idea has come from the RSS-BJP's street brain.  The name of Dnyanjyoti Savitribai Phule has been deliberately defaced.  The corporation has decided to name the park.  In it, who suggested to put the name of Sadhvi next to the name of Savitribai Phule and who gave permission for such a name and how. The Pune Municipal Corporation is fully responsible for this. This should be investigated.

 Jnanjyoti Savitribai Phule laid the foundation of women's education in 1848 at Bhidewada in Pune by carrying stones and mud on her body.  Opened the doors of education for women of all castes and religions.  The street brain of Manuvadi mentality has conspired to erase the work of such a revolutionary Jyoti by naming her as Sadhvi.  He became a Minister, Chief Minister, Prime Minister and President only through the revolution of education.

 What a revolution the nun has made.  Sadhvis only build monasteries and enslave women in the name of religion and make them slaves in the monastery.  There is no such history. In the name of religion, women have been enslaved to get crores of rupees.  Sadhvi is a symbol of denial.  Manuvadis are making this insidious ploy to erase the work of Gyanjyoti Savitribai Phule by putting such a symbol of pro-Hindu denialism next to her name.

 It is being Hinduized by destroying the revolutionary history of great men of Bahujan Samaj.  Those who do not have any kind of bravery or revolutionary history, such conspiracies are hatched by the Shandloks to erase the history of bravery and prowess of others.  He has erased the name 'Sadhvi' from Savitribai Phule's name and demanded action against the Pune Municipal Corporation administration.
Previous
Next Post »