मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा युवकांसाठी नौकरभरती काढण्यासाठी आंदोलन करावे

मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा युवकांसाठी नौकरभरती काढण्यासाठी आंदोलन करावे!

मागील दिडवर्षांपासून कोरोना मुळे देश व राज्यातील अर्थ व्यवस्था पूर्ण पणे कोलमडली आहे. कोरोना मुळे लागलेलं लॉकडाउन नौकरदाराच्या पथ्यावर पडलं. लॉकडाउन दरम्यान लाखो लोकांचे रोजगार बंद झाले अनेकांच्या नौकऱ्या गेल्या. व्यवसायाशी संबंधित सर्वच क्षत्र बंद झाले होते. ज्यामुळे रोजगाराचा मार्गच बंद झाला होता. आता काही प्रमाणात दुकाने, मॉल्स, हॉटेल्स उद्योग निर्मिती संबंधित कारखाने,अशा आस्थापना सुरु करण्यास सरकार ने परवानगी दिली आहे.

परंतु राज्यात धार्मिक स्थळे उघडण्यास अजून सरकारने परवानगी दिलेली नाही.मंदिरं उघडण्यात यावी यासाठी भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यभर शंखणाद आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात लाखो सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. नौकरी चे वय संपत चालले आहे. कुटुंबाचा आधार बनण्याऐवजी कुटुंबावर बोज झाल्याची भावना तरुणांना सतावत आहे.अशा परिस्थितीत तरुणांना नौकरी ची गरज आहे.वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देण्याचा वादा करणाऱ्या मोदींना भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीने जाब विचारला पाहिजे.ह्या तरुणांना सरकारी नौकरी मिळावी यासाठी भाजपाच्या कोणत्याच आघाडीच्या वतीने आंदोलन होत नाही.केवळ देव-धर्माच्या नावाने लोकांना भावनिक करून आपली राजकीय पोळी भाजायची हा एकमेव उद्देश भाजपाचा आहे.

देशातील अनेक सरकारी क्षेत्र जिथे मोठ्या प्रमाणात नौकर भरती व्हायची ती सर्व खाजगी करण्यात आली आहेत.रेल्वे चे खाजगीकरण, एअर इंडिया, पेट्रीलियम कंपन्या, विद्युत निर्माण कंपनी,अशा अनेक सरकारी संस्था खाजगी करून सरकारी नौकरी मिळन्याचा मार्ग बंद केला आहे. ज्यामुळे देशातील करोडो युवकांना बेरोजगारी चा सामना करावा लागत आहे. आता पर्यंत राम मंदिराच्या नावाखाली युवकांना भावनिक करून सत्ता मिळवून आपले उद्दिष्ट सध्य केलं. परंतु ज्या राम मंदिरासाठी ज्यांनी लाठ्या काठ्या अंगावर घेतल्या अनेकांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना काय भेटलं.

राममंदिर निर्माण समिती मध्ये किती ओबीसी सदस्य घेतले,किती एससी एसटी चे सदस्य घेतले आहे. या पैकी कोणीही सदस्य नाही. ज्यांच्या दान धर्मावर मंदिरं निर्माण केली जातात. मंदिरातले पुजारी जगविले जातात त्यांना रोजगार मिळावा त्यांना सरकारी नौकऱ्या मिळाव्यात यासाठी का आंदोलने केली जात नाहीत.मंदिराशी संबंधित असलेल्या व्यवसायिकांवर उपासमारी आल्याचा पुळका तुम्हालाच कसा आला.खरच तुम्हाला जनतेविषयी एवढी आस्था आहे तर तरुणांना नौकरी मिळावी यासाठी शंखणाद आंदोलन करा.
संग्रहित छाया:

Instead of agitating for opening temples, we should agitate for recruitment of youth!

 For the last one and a half years, the economy of the country and the state has completely collapsed due to the corona.  The lockdown caused by the corona fell on the employee's path.  Millions lost their jobs during the lockdown and many lost their jobs.  All business-related areas were closed.  Which closed the way to employment.  Now the government has given permission to start some establishments such as shops, malls, hotels and industries.

 However, the government has not yet given permission for the opening of religious places in the state.  There are millions of educated youth unemployed in the state.  The age of the job is coming to an end.  Instead of being the backbone of the family, the youth are suffering from the feeling of burden on the family. In such a situation, the youth need a job.  -The only objective of BJP is to burn its political nest by making people emotional in the name of religion.

 Many government sectors in the country where a large number of employees are being recruited have been privatized.  As a result, millions of youth in the country are facing unemployment.  Till now, under the name of Ram Mandir, we have achieved our goal by making the youth emotional and gaining power.  But what happened to the Ram temple for which many people who had to carry sticks had to lose their lives.

 How many OBC members have been taken in Rammandir Nirman Samiti, how many SC ST members have been taken.  None of these are members.  On whose charity temples are built.  The priests of the temple are kept alive. Why are there no agitations for them to get employment and get government jobs?


Previous
Next Post »