भाजपाची शेतकरी विरोधी आणि अन्यायकारक भूमिका:
हरियाणा राज्यात भाजपा-जेजेपी ची सत्ता असून मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर तिथला राज्य कारभार हाकतात. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे शनिवारी भाजपाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान हरियाणातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी भाजपाच्या बैठकीला विरोध करणार असल्याचे शेतकारी संघटनाच्या नेत्यांनी विडिओ कॉन्फरेन्स द्वारे जाहीर केलं होतं.
शेतकरी संघटनाच्या नेत्याकडून भाजपाच्या बैठकीला होणाऱ्या विरोधाच्या पार्स्वभूमीवर खट्टर सरकारने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला होता. तरी पण शेतकरी विरोधी कायद्याचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्नाल जिल्ह्यातील घारोंडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन सुरु केलं. शांततेत व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यावर अमानुष पणे पोलिसाकडून लाठीचार करण्यात आला आहे. पोलीसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये दहा शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.अशा प्रकारे शेतकऱ्यावर अमानुष पणे लाठीचार्ज करणे ही अतिशय दुर्दैवी घटना आहे.या घटनेमुळे शेतकरी संघटना सरकारच्या विरोधात आणखी आक्रमक झाल्या आहेत.
भाजपाची नीती मुळातच शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधात आहे.शेतकरी त्यांच्या न्याय हक्कासाठी जर घरणे आंदोलन किंवा निदर्शने करत असतील तर तो त्यांचा अधिकार आहे.पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन दडपून टाकून मुस्कट दाबी केली जात आहे. अशा प्रकारचा शेतकऱ्यावर अन्याय करणे म्हणजे ब्रिटिश राजवटीतील जनरल डायर ची पुनर्रावरती भाजपा सरकार करत आहे.
जवळपास आठ नऊ महिने होत आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्ली व हरियाणा राज्यातील शेतकरी आंदोलन करत आहेत.गेंड्याची कातडी पांघरून घेतलेलं आणि शेतकरी विरोधी मानसिकता असलेलं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मागणीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे.भाजपाला निवडणुकीत भरमसाठ पैसा पुरवणाऱ्या धनदांडग्या लोकांना फायदा व्हावा यासाठी मोदी सरकार काम करत आहे.याचाच निषेध करण्यासाठी हरियाणातील भाजपच्या होत असलेल्या राज्यस्तरीय बैठकी विरोधात शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष पणे लाठीचार्ज केला गेला.
BJP's anti-farmer and unjust role:
Haryana is ruled by the BJP-JJP and is headed by Chief Minister Manohar Lal Khattar. The state level meeting of the BJP was held on Saturday as local body elections are to be held in the state. Meanwhile, farmers in Haryana had announced in a video conference that they would oppose the BJP's meeting to protest against the central government's anti-farmer law.
The Khattar government had deployed a large number of police personnel against the backdrop of opposition to the BJP meeting by the farmers' union leader. However, the farmers started a sit-in agitation at Gharonda toll plaza in Karnal district to oppose the anti-farmer law. Farmers protesting peacefully and democratically have been inhumanely beaten by the police. Ten farmers have been seriously injured in the police baton charge. It is very unfortunate that inhumane baton charge has been inflicted on the farmers. This incident has made the farmers' organizations more aggressive against the government.
The BJP's policy is basically against the farmers and the general public. If the farmers are protesting or protesting for their right to justice, then it is their right. This kind of injustice to the farmers is what the BJP government is doing to General Dyer in the British Raj.
It has been almost eight or nine months now that farmers in Delhi and Haryana have been protesting against the Centre's anti-farmer law. The government is working. To protest against this, the farmers were protesting in a democratic way against the state level meeting of the BJP in Haryana. They were inhumanely lathicharged.
ConversionConversion EmoticonEmoticon