शांतता हाच देश प्रगतीचा मार्ग आहे

कोणत्याही देशाला प्रगती करायची असेल तर तिथे शांतता नांदली पाहिजे
माणसाच्या प्रगती साठी त्याच्या जीवनात शांतता असणे अतिमहत्वाचं असते. एखाद्या कुटुंबात सतत भांडणं वादविवाद होत असतील तर त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

अशी व्यक्ती आपल्या नौकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काम करत असताना त्याच्यात छिड छिड पणा, नैराश्य येते. त्यामुळे तेथील कामावर देखील परिणाम होतो. त्यामुळे हातावर असलेलं काम किंवा व्यवसायातील निर्धारित लक्ष पूर्ण होत नाही. त्यामुळे त्याच्या आर्थिक प्रगती वर वाईट परिणाम होतो.जेंव्हा कुटुंबातील आर्थिक प्रगती थांबते तेव्हा त्या कुटुंबातील लोकांची सुद्धा परवड होते.

ज्या प्रमाणे एखाद्या कुटुंबात शांतता नसल्यामुळे त्या कुटुंबातील सर्वच बाजूने प्रगती खुंटते तसेच एखाद्या राज्यात किंवा देशात सतत अंतर्गत किंवा बाह्य युद्ध चा सामना करावा लागत असेल तर त्या देशातील सरकार ला अंतर्गत किंवा बाह्य शत्रूशी लढावे लागते. त्याचा वाईट परिणाम देशाच्या आर्थिक प्रगतीवर होतो. अशा परिस्थितीत जनता नेहमी भयबीत असते. त्यांचं आपल्या नौकरी किंवा व्यवसायात मन लागत नाही. नौकरी किंवा व्यवसायातील इच्छित लक्ष वेळेत पूर्ण होत नाही. याचा वाईट परिणाम देशातील आर्थिक प्रगतीवर होतो.जेंव्हा देश आर्थिक दृष्ट्या कमजोर होतो तेंव्हा देशातील जनतेला रोजगार मिळणे कठीण होते. आर्थिक व गरिबीसारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागते.

सध्य आपण अफगाणिस्तानची परिस्थिती पहात आहोत. तालीबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील जनता आपला जिव वाचविण्यासाठी साईराभैरा पळत आहेत. देश सोडून जाण्यासाठी प्रयात करताना आपण पहात आहोत. जिथे नागरिकच सुरक्षित नसतील तर त्या देशाची सर्वांगीण प्रगती कधीच होऊ शकत नाही.

सम्राट अशोकाने देखील जग जिंकण्याच्या नादात अनेक युद्ध केले.ज्यामध्ये लाखो सैनिक मारले गेले रक्तपात झाला. जेव्हा अशोकाला समजले की राज्य करण्यासाठी प्रजाच नसेल तर राज्य कुणावर करायचं? म्हणून सम्राट अशोकाने बुद्धाच्या शांतीचा मार्ग स्विकारण्याचा निर्णय घेतला. बुद्ध विचाराचा स्विकार केला आणि जगात बुद्धाच्या शांती विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्र ला कर्तव्यावर पाठवले.म्हणून जगातील कोणत्याही राष्ट्राला प्रगती करायची असेल तर युद्ध नको बुद्ध हवा आहे.
If any country wants to make progress, there must be peace

 Having peace in one's life is crucial for one's progress.  If there are constant arguments in a family, the mental health of every member of that family will be adversely affected.


 When such a person is working at his job or place of business, he gets irritable and depressed.  It also affects the work there.  Therefore, the task at hand or the prescribed focus in the business is not fulfilled.  This has a detrimental effect on his financial progress. When the financial progress of a family stops, the people in that family can also afford it.


 Just as the absence of peace in a family impedes progress on all sides of the family, and a state or country has to face constant internal or external war, the government of that country has to fight internal or external enemies.  It has a detrimental effect on the economic progress of the country.  In such a situation, the public is always scared.  They don't care about their job or business.  The desired focus in a job or business is not completed on time.  This has a detrimental effect on the economic progress of the country. When the country is economically weak, it is difficult for the people of the country to get employment.  We have to deal with economic and poverty situations.


 We are currently looking at the situation in Afghanistan.  People in the country are fleeing to Sairabhaira to save their lives after being captured by the Taliban.  We see him trying to leave the country.  Where citizens are not safe, the country can never prosper.


 Emperor Ashoka also fought many battles in a bid to conquer the world, in which millions of soldiers were killed and bloodshed ensued.  When Ashoka understood that there is no people to rule, then who should rule?  So Emperor Ashoka decided to follow the Buddha's path of peace.  He accepted the Buddha's thought and sent his son Mahendra and daughter Sanghamitra on duty to propagate the Buddha's idea of ​​peace in the world.


Previous
Next Post »