भरमसाठ इंधन वाढ ;जनता बेहाल

भरमसाठ इंधन दर वाढ जनता झाली बेहाल 
सध्य देशात सर्वसामान्य जनतेला न परवडणारी इंधन दर वाढ केली जात आहे.उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे.एकीकडे सबका साथ सबका विकास चा नारा लावणारे केंद्रातील मोदी सरकार महिन्यातून दोन वेळ इंधन दर वाढ करत आहे.घरगुती इंधन (गॅस )ची किंमत एक हजार रुपये पर्यंत पोहचली आहे तर पेट्रोल एकशे दहा रुपये च्या पुढे गेले असुन डिजेलने शंभरी गाठली आहे.

सर्वसामान्य जनतेच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना अशा प्रकारची घरगुती गॅस,डिझेल आणि पेट्रोल ची भरमसाठ दर वाढ होत असल्याने जनता हैराण झाली आहे. सरकार एकाबाजूने उज्ज्वला योजनेचा ढोल वाजवत आहे तर दुसरीकडे घरगुती गॅस ची किंमत महिन्यातून दोन वेळा वाढवत आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या इंधन दर वाढीमुळे सर्वसामान्य जनतेचं आर्थिक कंबरड मोडलं आहे.शेतकऱ्याच्या शेतीमालाचा वाहतूक खर्च वाढला आहे लहान सहान व्यापारी यांना सुद्धा इंधन दरवाढीचा फटका बसला आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, व्यापारी, मजदूर जनता चिंताग्रस्त झाली आहे.केंद्र सरकार आणि राज्य सरकार इंधन दर वाढीकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

केंद्र व राज्य सरकारांनी घरगुती गॅस, डिझेल आणि पेट्रोल दरावरील  टॅक्स कमी करून जनतेला दिलासा द्यावा अशी जनतेची मागणी आहे.

Previous
Next Post »