मोदी सरकारचा निर्णय कोकण रेल्वे ठेकेदाराच्या घशात
केंद्रातील मोदी सरकारने कोकण रेल्वे ठेकेदारी पद्धतीने चालवीण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी मालगाडीचे खाजगीकरण करून अदानी च्या घशात घातली. काही रेल्वे स्थानक सुद्धा खाजगी कंपनी ला चालवायला दिली आहेत. केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांचे सरास पणे खाजगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे.विमान तळ विकले, LIC विकले, आता कोकण रेल्वे विकून ठेकेदाराच्या घशात घातली.
मोदी सरकारने सातवर्षाच्या काळात देशासाठी काही निर्माण तर केलं नाही ;परंतु मागील सत्तर वर्षात जेकाही निर्माण केलं होत ते विकण्याचा घाट घातला आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण करून नौकरीचा मार्ग बंद केला जात आहे.खासजगीकरण करून सरकारी क्षेत्रातील नौकऱ्या संपविण्याचे षडयंत्र केंदतील मोदी सरकार करत आहे.
वर्षाला दोन कोटी नौकऱ्या देण्याची व्हलगना करणारे प्रधानमंत्री मोदी, सरकारी संस्थाच विकून टाकत आहे.
देशातील युवकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने कोणतेच धोरण केंद्र सरकार ठरवत नाही उलट जिथे मोठ्या प्रमाणात सरकारी नौकरी मिळण्याचे खाते आहेत तेच खाजगी करून लाखो युवकांच्या नौकरीचा मार्ग बंद केला जात आहे.युवकांना बेरोजगार करण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे असेच दिसून येत आहे.
आज कोकण रेल्वे विकली उद्या मध्ये रेल्वे विकली जाणार, नंतर दक्षिण मध्य रेल्वे विकणार. असं करून टप्या टप्याने देशील संपूर्ण रेल्वे विकून ठेकेदारांचा विकास प्रधानमंत्री मोदी करत आहेत. केंद्र सरकारच्या नियंत्रणातील कोणतेच क्षेत्र असे नाही जे मोदींनी विकले नाही. सर्वच क्षेत्र खाजगी करण्याचा सपाटा लावला आहे. अस करत करत देश विकायला काढला जाईल यात शंकाच नाही.
चाणक्य अस म्हणतो की "जिथला राजा व्यापारी तिथली प्रजा भिकारी" या चाणक्याच्या वाक्याप्रमाणे प्रधानमंत्री मोदींनी अनेक वेळा सांगितलं आहे मी व्यापारी असून माझ्या रक्तातच व्यापार आहे. मग प्रधानमंत्री मोदीजी व्यापारी असतील तर देशातील प्रजा कशी असेल याचा अंदाज आपल्या सर्वांना आलाच असेल. याच नितीचा वापर करून ठराविक धनदांडग्याना आदिक श्रीमंत करायचं आणि देशातील जनतेला कंगाल करून भिकारी बनवायचं हाच एकमेव उद्देश प्रधानमंत्री मोदींचा असल्याचा दिसतो आहे.
मोदीजींनी देशातील कोणकोणत्या सरकारी संस्था विकल्या आहेत आणि याचा फायदा कोणाला केला जात आहे. हे खालील चित्रावरून स्पष्ट होते.
Modi government's decision ; Konkan railway in the throt of contractor
The Modi government at the Center has decided to run the Konkan Railway on a contract basis. Earlier, the freight train was privatized and put in Adani's throat. Some railway stations are also allowed to be run by a private company. The Modi government has planned to privatize the institutions under the control of the central government.
The Modi government has not done anything for the country in the last seven years, but it is planning to sell whatever it has done in the last seventy years. On the one hand, while unemployment is on the rise, jobs are being blocked by privatizing the public sector.
Prime Minister Modi, who has promised to provide two crore jobs a year, is selling out government institutions.
The central government does not formulate any policy to provide employment to the youth of the country.
Konkan Railway sold today Railways will be sold tomorrow, then South Central Railway will be sold. By doing so, Prime Minister Modi is developing the contractors by selling the entire railway in stages. There is no area under the control of the central government that Modi has not sold. All areas are being privatized. By doing so, there is no doubt that the country will be sold.
Chanakya says that Prime Minister Modi has said many times like Chanakya's phrase "Jithala Raja Vyapari Tithali Praja Bhikari". I am a trader and trade is in my blood. Then if Prime Minister Modiji is a businessman, then all of us must have guessed what the people of the country will be like. It seems that the only objective of Prime Minister Modi is to make certain rich people rich by using this policy and to make the people of the country beggars.
Modiji has sold some government institutions in the country and who is benefiting from it. This is clear from the picture below.
ConversionConversion EmoticonEmoticon