अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेला अधिकार
भारतात राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्माच्या नागरिकांना आपापल्या धर्म पंथानुसार पूजा अर्चा करणे पोशाख परिधान करणे, बोलीभाषा आणि आपल्या भावना, मत व्यक्त करणे हे भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे.एखाद्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकार दरबारी आपल्या भावना किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्या व्यक्तीला त्याच्या भावना किंवा मत व्यक्त करण्यापासून सरकार किंवा कोणीही थांबवू शकत नाही कारण तो संविधानाने दिलेला अधिकार आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नाही
काल महाराष्ट्रात नविन राजकीय संघर्ष पेटला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली आणि संपूर्ण राज्यात चर्चेला उधाण आलं. भाजपा विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगला. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात समोरासमोर भिडले. परंतु या संघर्षाच कारण काय? भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लावण्याची भाषा केली.
एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणजे ते संविधानिक पद असते आणि राज्याचा प्रमुख असते. अशा व्यक्तीला वैयक्तिकपातळीवर अपमाणित करणे हा गुन्हाच आहे.
विरोधी पक्ष किंवा त्या पक्षाचे नेते किंवा अन्य कुणीही सरकारच्या उनिवा काढणे, त्याची जाणीव सरकारला करून देणे, लोक हितासाठी जन आंदोलन करणे, जनहिताचे निर्णय घेण्यास सरकारला भाग पाडण. सरकारचे धोरण जनतेच्या हिताचे नसतील तर त्यावर टीका टिप्पणी करणे यात काहीच गैर नाही. लोकशाही मध्ये संविधानाने दिलेला तो अधिकार आहे.
परंतु केंद्रीयमंत्री नारायण राणे हे एक जबाबदार व्यक्ती आहेत त्यांनी संविधानिक पदाचा आदर करायला पाहिजे होता.राजकीय मंचावरून राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अपमानस्पद बोलणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या व्याखेत बसत नाही. राजकीय मुद्यावरून टीका टिप्पणी करणे यात काहीच गैर नाही परंतु द्वेष भावनेतून वैयक्तिक पातळीवर अपमानास्पद बोलणे कितपत योग्य आहे. नारायण राणे हे जबाबदार व्यक्ती असून मुख्यमंत्र्याच्या कानशिलात मारण्याची भाषा करता हेमात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार आहे.
Freedom of expression is a constitutional right to express one's feelings
Citizens of all castes and religions living in India have the right under the Indian Constitution to worship, dress, speak and express their feelings and opinions according to their religion. Neither the government nor anyone else can stop that person from expressing his feelings or opinions because it is a constitutional right.
Freedom of expression does not mean arbitrariness
A new political conflict erupted in Maharashtra yesterday. Union Minister Narayan Rane was arrested and the discussion spread across the state. A direct match was played between BJP and Shiv Sena. The two sides clashed head-on against each other. But what is the cause of this conflict? During the BJP's Jan Ashirwad Yatra, Union Minister Narayan Rane spoke of placing stones on the ears of Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray.
The Chief Minister of a state is a constitutional post and is the head of state. It is a crime to insult such a person on a personal level.
To make the government aware of the shortcomings of the opposition party or its leader or anyone else, to make the government aware of it, to agitate for the public interest, to force the government to take decisions in the public interest. There is nothing wrong with criticizing government policies if they are not in the public interest. In a democracy, it is a constitutional right.
But Union Minister Narayan Rane is a responsible person who should have respected the constitutional position. There is nothing wrong with commenting on a political issue but how appropriate it is to speak insultingly on a personal level out of hatred. Narayan Rane is a responsible person and this is the arbitrariness of freedom of expression.
ConversionConversion EmoticonEmoticon