आतंकवादी संघटनाचे समर्थन म्हणजे देश विघातक विचार आहेत
कुठल्याही राज्यात किंवा देशात एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार होत असतील तर अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हा अधिकार त्या समाजाला, समुदायला लोकशाहीमध्ये असतो. अन्याय अत्याचारच्या विरुद्ध लढा लढणे आपले हक्क अधिकार मिळवणे हा मानवी अधिकार आहे. परंतु एखादे दहशतवादी विचाराचे संघटन संपूर्ण राज्यावर किंवा देशावर आपले विचार लादून आपल्या मर्जीने देश चालवीने हे कोणत्याही देशातील प्रजेच्या हिताचे नसते.
दहशतवादी विचाराचे लोक कुणाच्याही हिताचे नसतात. धर्माच्या नावाखाली समाजाला वेठीस धरतात. त्यांच्यात माणुसकीचा पाझर कधीच नसतो. आपले कट्टरपंती विचार आणि बंधूकीच्या जोरावर जनतेला गुलाम बनवून त्यांच्यावर राज्य करणे हे त्यांचे एकमेव ध्येय असते.
कट्टरपंती लोक कोणत्याही धर्माचे असोत ते देशासाठी घातकच असतात.
आपण अफगाणिस्तान ची सध्य परिस्थिती पहात आहोत. कट्टरपंती दहशतवादी तालीबान्यांनी अफगाणिस्तान वर कब्जा मिळवल्यावर तिथल्या जनतेचे काय हाल आहेत. देश सोडून जाण्यासाठी लोकांची एकच धावपळ सुरु झाली. महिला असो की लहान मुलं यांना सुद्धा तालिबानी लक्ष बनवत आहेत. महिलांना गोळया घालत आहेत. कोडे मारत आहेत अशी क्रूर मानसिकता असल्यामुळेच तेथील लोक देशसोडून जात आहेत.
अफगाणिस्तान मध्ये आता महिलांना नौकरी, व्यवसाय व शिक्षण स्वातंत्र्य मिळणार नाही.अशा जुलमी क्रूर विचाराच्या तालिबानी राजवटीचे समर्थन करणे म्हणजे देश विघातक विचार आहेत.
Support for a terrorist organization means destructive thinking
In any state or country, if injustice is being perpetrated against a community, then the right to speak out against injustice belongs to that community, the community in a democracy. Fighting against injustice is a human right. But it is not in the interest of the people of any country for an organization of terrorist ideology to impose its ideology on the entire state or country and run the country as it pleases.
Terrorist minded people are not in anyone's interest. They hold society hostage in the name of religion. There is never a trace of humanity in them. Their only goal is to enslave the people and rule them on the strength of their radical ideas and brotherhood.
Radical people of any religion are dangerous for the country.
We are looking at the current situation in Afghanistan. How are the people of Afghanistan after the radical Taliban took over? The only rush of people to leave the country began. Women and children are also being targeted by the Taliban. Women are being shot. People are fleeing the country because of the brutal mentality of puzzles.
In Afghanistan, women will no longer have the freedom of employment, business and education. Supporting such a brutal Taliban regime is destructive.
ConversionConversion EmoticonEmoticon