मोदी सरकारकडून ओबीसी जनगणना नाकारून विश्वास घात ;बीआरएसपी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. डॉ सुरेश माने यांचा आरोप '| OBC reservation:

मोदी सरकार मधील गृहमंत्री अमित शहा यांनी 2021मधे ओबीसी ची जनगणना केली जाणार असून ही जनगणना करणारे देशातील पहिले भाजपा सरकार असल्याचे सांगितलं होतं परंतु आता त्याच सरकार मधील गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसी जनगणना होणार नसल्याची लोकसभेत घोषणा करून ओबीसी चा विश्वास घात केल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी चे संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेश माने यांनी केला आहे. डॉ सुरेश माने यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात हा आरोप करण्यात आला आहे.


ओबीसी जनगणना करण्यासाठी मोदी सरकारने राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे शिफारस सुद्धा केली होती त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात ओबीसी जनगणनेसाठी प्रलंबित याचिकेत सरकारकडून सकारात्मक भूमिका मांडावी असे देखील सुचवले होते शिवाय ओबीसी कल्याण समिती व केंद्रातील सामाजिक न्याय मंत्रालयाने  सुद्धा समर्थन केले होते एवढेच नव्हे तर देशातील ओबीसी चे चार तुकडे करून 27 टक्के आरक्षण चार विभागात करण्यासाठी भाजप सरकारने 2017 मधे नियुक्त केलेल्या न्यायमूर्ती रोहिणी आयोगाने सुद्धा देशातील ओबीसी चे चार विभागात वर्गवारी करण्याची ओबीसी ची गरज मांडली होती.असे सर्व असताना 20 जुलै रोजी गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी ओबीसी ची जनगणना होणार नाही असे लोकसभेत जाहीर करून ओबीसी चा अपेक्षाभंग केला आहे याचा अर्थ एकच होतो कि मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी जनगणनेची केवळ घोषणा करून त्यांची मते मिळवायची होती आणि नंतर जनगणनेला नकार द्यायचा असेच यातून स्पष्ट होते खरं तर ओबीसी जनगणनेला आरएसएस चा पहिल्यापासून विरोध आहे तशी भूमिका त्यांच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी मांडली आहे.मोदी सरकारची आताची घोषणा बघता संघपरिवार सरकारची धोरणे  ठरविताना धवळाढवळ करत असल्याचा हा पुरावा आहे. आर एस एस च्या दबावाखाली मोदी सरकारने ओबीसी जनगणना नाकारल्याचा आरोप डॉ सुरेश माने यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.

तुम्ही आमच्या खालील लिंक करून Awaaz Yuva Bharat ह्या youtube channel ला सुद्धा भेट देवू शकता: https://youtube.com/channel/UCFgmjJWMfTL3JCB4ob3SXNg

English translation :

Home Minister Amit Shah in the Modi government had said that the census of OBCs would be conducted in 2021 and this was the first BJP government in the country to conduct a census but now Minister of State for Home Affairs Nityanand Rai in the same government has accused the OBCs of betraying the OBCs by announcing in the Lok Sabha.  The founding president of Bahujan Republican Socialist Party Dr. Suresh Mane has done.  This allegation has been made in the press release given by Dr. Suresh Mane.
The Modi government had also recommended the National Backward Classes Commission to conduct an OBC census. The apex court had also asked the government to play a positive role in the pending petition for the OBC census.  The Justice Rohini Commission, appointed by the BJP government in 2017 to make 27 per cent reservation in four divisions, had also called for OBCs to be categorized as OBCs in the country in four divisions.  This only means that the Modi government only wanted to get their votes by announcing the OBC census in the run-up to the Lok Sabha elections and then rejecting the census.  Looking at the announcement now, Sanghpariva  This is proof that the government is interfering in policy making.  In a press release, Dr. Suresh Mane has accused the Modi government of rejecting the OBC census under the pressure of the RSS.




Previous
Next Post »