राज्यात अतिवृष्टीमुळे 209जणांचा बळी ;सरकारी आर्थिक मदतीची अद्याप घोषणा नाही.

राज्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली,सातारा,रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात महापूर आल्याने लाखो लोकांचे जनजीवन बाधित झाले आहे. लाखो हेक्टर जमिनी पुराच्या पाण्याखाली आल्याने शेती पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. पुरामुळे गावच्यागाव पाण्यात बुडाली लाखो लोकांचे संसार उद्धवस्त झाले. बाजार पेठा पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांवर दरडी कोसळून अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. ज्या गावावर दरडी कोसळल्या आहेत तेथील घरे संपूर्णपणे दरडीच्या धिगाऱ्याखाली दबून गेली आहेत.सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात मिरगाव येथे दरड कोसळून दहा लोकांचा बळी गेला आहे तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये तळीये गावात दरड कोसळून पन्नास पेक्षा अधिक जणांचा जीव गेला अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले.आज पर्यंत पुरामुळे व दरडी कोसळून 209 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत.पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे दौरे झाले. लोकांना आर्थिक मदतीची तातडीने आवश्यकता असतांना सरकारकडून नुकसान ग्रसतांना आर्थिक मदतीची अधिकृत घोषणा अजून  तरी झाली नाही.

English translation:
Extreme levels of flood danger were announced in Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiri and Raigad districts of the state.  Millions of hectares of land have been inundated, causing severe damage to crops.  The floods have submerged millions of people in villages.  Traders have suffered a lot due to the submergence of markets.  Extreme levels of flood danger were announced in many parts of the country.  The houses in the villages where the landslides have collapsed have been completely buried under the rubble. Ten people have been killed in a landslide at Mirgaon in Patan taluka of Satara district while more than fifty people have been killed in a landslide at Taliye village in Mahad taluka of Raigad district.  State Chief Minister Uddhav Thackeray, Deputy Chief Minister Ajit Pawar to inspect flood-hit areas Leader of Opposition Devendra Fadnavis also visited.  While the people are in dire need of financial assistance, the government has not yet officially announced financial assistance to the victims.

Previous
Next Post »