राज्याच्या ग्रामविकास व बाल्कल्याण खात्याच्या माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंढे यांनी बीड जिल्ह्यातील परळी येथे दि.29 जुलै रोजी राज्यातील पूरग्रस्त लोकांसाठी मदत फेरी काढली. मदत फेरी मधे जेवढी रक्कम जमा होईल तेवढीच रक्कम मुंढे प्रतिष्ठान तर्फे पूरग्रस्तांना दिली जाणार आहे. अशा परिस्थिती मधे पूरग्रस्तांना मदत करणे अतिशय चांगला उपक्रम आहे परंतु वर्षभरापासून कोरोना आणि त्यामुळे केलेलं लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य व हातावर पोट असणारा मजदूर, रस्त्यावर भाजीपाला विकणारे व अनेक फेरीवाले लोकं जे आधीच आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचलेले असतांना त्याच्याकडून मदत घेणे कितपत योग्य आहे. खरं तर त्या एकट्याही लाखोची मदत करू शकतात परंतु या फेरीच्या माध्यमातून लोकांशी प्रत्यक्षात जनसंपर्क करून मतदार संघातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी संधीचा फायदा घेतला जातोय हे मात्र नक्की.
अनेक दिवसापासून पुणेकरांना मेट्रो रेल सुरु होण्याची प्रतीक्षा होती आता ती संपली आहे. दि 30 जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मधे उदघाटन सोहळा पारपडला . सकाळी 7 वा. अजित पवार यांनी तीन डब्बे असलेल्या मेट्रो रेल ला हिरवी झेंडी दाखवून ट्रायल घेण्यात आली.वानाज ते आयडीयल कॉलनी 3.5 कि.मी अंतर मेट्रोची ट्रायल घेण्यात आली.मेट्रो रेलमुळे पुणेकरांना प्रवास सुखद झाला आहे. रहदारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली होती पुण्याबाहेरील लोकं शिक्षणासाठी व कामाच्या निमित्ताने पुण्यात येत असल्यामुळे रस्त्यावर मोठ्याप्रमाणात गर्दी झालेली पहायला मिळते त्यामुळे रस्ता वाहतूकीला अडथळा निर्माण शहारा अंतर्गत ये जा करणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावालागत होता. आता मेट्रो रेल सुरु झाल्यामुळे पुणेकरांची वाहतूकीची समस्या सुटली असून याचा पुणेकरांना आनंद झाला आहे.
वीज बिलासंबंधी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा :
सांगली कोल्हापूर व रायगड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील लोकांना वीज बिल भरण्याबाबत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुली ताबडतोब थांबवण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. या भागातील पूरपरिस्थिती निवळल्यावर वीज बिल भरावे असे सांगितले आहे.वीज बिल भरण्यास सवलत दिली जाईल.परंतु वीज बिल माफ करता येणार नाही. वीज बिल माफ करण्याचा निर्णय मंत्री मंडळ घेईल असे नितीन राऊत यांनी सांगली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता सांगितले आहे.
English Translation :
Former Minister for Rural Development and Child Welfare and BJP leader Pankaja Mundhe organized a relief drive for flood victims in the state on July 29 at Parli in Beed district. The same amount will be given to the flood victims by Mundhe Pratishthan as much as will be collected in the relief round. Helping flood victims in such situations is a great undertaking, but the corona and the resulting lockdown over the years have made it difficult for ordinary and well-to-do laborers, street vendors and many peddlers who are already financially exhausted to seek help. In fact, they alone can help millions, but it is clear that through this round, people are actually taking advantage of the opportunity to reach out to the people in the constituency through public relations.
Punekar's Metro Rail wait is over:
For many days, Pune residents have been waiting for the Metro train to start, but now it is over. The inauguration ceremony was held on July 30 in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar. 7 a.m. Ajit Pawar conducted a trial by showing a green flag to a three-coach metro train. A 3.5 km metro trial was conducted from Wanaj to Ideal Colony. The problem of traffic was increasing day by day. People from outside Pune were coming to Pune for education and work. Due to this, the roads were very crowded. Now that the Metro Rail has started, the transportation problem of the people of Pune has been solved and the people of Pune are happy about it.
Energy Minister Nitin Raut's big announcement regarding electricity bill:
People in flood-hit areas of Sangli, Kolhapur and Raigad districts have been relieved about paying their electricity bills. State Energy Minister Nitin Raut has ordered immediate halt to collection of electricity bills in the flood-hit areas. It has been asked to pay the electricity bill after the flood situation in this area is resolved. Concession will be given to pay the electricity bill. But the electricity bill cannot be waived. The decision to waive the electricity bill will be taken by the Cabinet, said Nitin Raut while visiting Sangli to inspect the flood-hit area.
ConversionConversion EmoticonEmoticon