अभियांत्रिकी शिक्षण यापुढे प्रादेशिक भाषेमध्ये घेता येणार आहे.एक वर्षांपूर्वी राष्ट्रीय शिक्षण धोरण (national education policy)ठरविण्यात आले होते त्याची घोषणा प्रधानमंत्री मोदींनी केली आहे.अभियांत्रिकी विषयांचे शिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक भाषेत चांगल्या प्रकारे घेता यावे.अभ्यास चांगल्या प्रकारे करता यावा आणि विषयांचे ज्ञान अधिकाधिक आत्मसात करता यावे ह्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करण्याची घोषणा मोदींनी केली आहे. या प्रादेशिक भाषामधे मराठी, हिंदी,तेलगू, तामिळ आणि बंगाली या भाषांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आता पर्यंत अभियांत्रिकी शिक्षण इंग्रजी मधे असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कल जास्त प्रमाणात नसायचा. आता मात्र अभियांत्रिकी चे दर्जेदार शिक्षण प्रादेशिक भाषेत विद्यार्थ्यांना घेता येईल असं सरकारला वाटते.परंतु या निर्णयामुळे अभियांत्रिकी शिक्षणाचा दर्जा किती प्रमाणात टिकून राहिल हे येत्याकाळात दिसून येईल. सध्यातरी राष्ट्रीय शिक्षण धोरणा(nep)चा एक भाग म्हणून प्रादेशिक भाषेत अभियांत्रिकी शिक्षण दिलं जाणार आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनीरिंग प्रवेशामध्ये 27टक्के आरक्षणाची केंद्र सरकारची घोषणा :
ओबीसी विद्यार्थ्यांना मेडिकल व इंजिनीरिंग शाखेचे शिक्षणात आरक्षण मिळावे यासाठी अनेक ओबीसी संघटना राजकीय पक्ष,नेते मंडळींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक दिवसाच्या मागणीला यश मिळाले असले तरी ओबीसी जातनिहाय जनगणना यावरील लक्ष हटविण्यासाठी मेडिकल व इंजिनीरिंग च्या शिक्षणामध्ये 27 टक्के आरक्षणाची केंद्र सरकाने घोषणा करून मूळ मुद्द्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला आहे.
English translation:
Engineering education will now be available in regional languages. Prime Minister Modi has announced the National Education Policy which was formulated a year ago. Modi has announced the implementation of a national education policy to be assimilated. These regional languages include Marathi, Hindi, Telugu, Tamil and Bengali. This will greatly benefit students in rural areas. Until now, since engineering education was in English, the tendency of students in rural areas was not high. Now the government thinks that quality engineering education can be imparted to the students in the regional language. But this decision will show in the future how much the quality of engineering education will be maintained. At present, engineering education in regional languages will be provided as part of the National Education Policy (NEP).
Central Government announces 27% reservation in medical and engineering admissions for OBC students:
A number of OBC organizations, political parties and leaders had consistently pursued for reservation in medical and engineering education for OBC students. Despite the success of several days of demand, the central government has tried to divert attention from the basic issue by announcing 27 per cent reservation in medical and engineering education to divert attention from the OBC caste-wise census.
ConversionConversion EmoticonEmoticon