आरोग्य पेपर फुटी प्रकरणाशी संबंधित दोन आरोपीना बीड आणि अमरावती मधून अटक
मुंबई : राज्यातील बहुचर्चित आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आली आहे. या प्रकरणातील आरोपिंचा आकडा वाढतच चालला आहे.शुक्रवारी दुपारी बीड मधून एक एजन्ट आणि अमरावती मधून एका एजेंटला अटक करण्यात आली आहे.अटक केलेल्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.या प्रकरणात गोपीचंद रामकृष्ण सानप (28 रा. वडझरी ता.पाटोदा जि. बीड ) तसेच नितीन सुधाकर जेऊरकर (46 रा. अमरावती ) अशी अटक केलेल्या आरोपिंची नावे आहेत.या प्रकारणतील गोपीचंद सानप हा आरोग्य सेवक म्हणून वर्धा जिल्ह्यात कार्यरत आहे. गोपीचंद याने एजन्ट म्हणून काम केलं आहे. त्याने आरोपीला मुले जमवून देण्याचे काम केलं आहे. किती मुलं जनवून दिले आणि त्यांच्याकडून किती पैसे घेतले याची चौकशी पोलीस करत आहे.
नितीन जेऊरकर हा मुख्य आरोपी निशिद गायकवाड याचा साथीदार आहे. निशिध गायकवाड हा पेपर फुटी प्रकरणातील आरोपी आहे. तो पोलिसांना तपास कार्यात सहकार्य करत नसल्याने नितीन जेऊरकर याची चौकशी केली जात आहे.गोविंद सानप आणि जेवूरकर आरोग्य पेपर फुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी आता पर्यंत 18 आरोपीना अटक केली आहे. यामुळे टी ई टी पेपर प्रकरणातील एजन्टचे चांगलेच धाबे दानाणले आहेत.
ConversionConversion EmoticonEmoticon