मुंबई : 23 फेब्रुवारी रोजी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी करून नाट्यमय रित्या अटक करण्यात आली. नवाब मलिक यांच्या घरी जाऊन ईडीने झाडाझडती घेतली परंतु काहीच पुरावा सापडला नाही.4 तास नवाब मलिक यांची ईडीने चौकशी केली. चौकशी नंतर नवाब मलिक यांना अटक केल्याची घोषणा ईडी ने केली. त्यानंतर नवाब मलिक यांना न्यायालयात हजर करण्यात येऊन सुनावणी झाली. दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने 3 मार्च पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ते म्हणले की मला ईडीकडून कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती. कोर्टात गेल्यावर समन्स वर माझी सही घेतली.केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैर वापर करून मला अटक करण्यात आली आहे असा आरोप नवाब मलिक यानी केला आहे. 1993 साली मुंबई मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपीची जमीन नवाब मलिक यानी खरीदी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे
20 वर्षानंतर हे प्रकरण उकरून काढून महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा गैर वापर करत आहे.मनी लॉंड्रीगच्या नावाखाली सूडबुद्धीने नवाब मलिक यांना अटक करण्यात आली असल्याचे राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी म्हटले आहे.तसेच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैर वापर करत असल्याचे महाविकास आघाडी सरकारने म्हटलं आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon