अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील कासारे गावचे सरपंचांना भररस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करत चपालांचा हार घातल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अहमदनगर :अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात असलेल्या कासारे गावचे मागासवर्गीय सरपंच महेश बोराडे यांना गवातील जातीवादी गावगुंडानी जातीवाचक शिवीगाळ करत भररस्त्यात चपलाचा हार घातला आहे. ही घटना अहमदनगर आणि महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणारी आहे.कासारे गावचे सरपंच महेश बोराडे हे काही कामानिमित्त बाहेर जात असताना त्यांना काही जातीवादी गावगुंडानी भर रस्त्यात अडवून जाती वाचक शिवीगाळ केली. जातीवादी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सरपंच महेश बोराडे यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला.
मागील काही दिवसापूर्वी कासारे गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत सरपंच पद हे मागासवर्गीयासाठी आरक्षणंद्वारे सुटलं होतं. त्यात महेश बोराडे हे आरक्षणामुळे सरपंच झाले होते. सरपंच पद मागासवर्गीयाकडे गेल्याचा राग मनात धरून जातीवादी मानसिकतेच्या गावागुंडानी महेश बोराडे यांची गाडी अडवून थांबविले मच्छिन्द्र कार्ले यांनी बोराडे यांचा हात धरून ठेवला आणि कृष्णा कार्ले यांनी महेश बोराडे यांच्या गळ्यात चपलाचा हार घालून मागासवर्गीय सरपंचाचा असाच सत्कार केला पाहिजे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे यांनी केला आहे.
सरपंच महेश बोराडे हे त्यांच्या बहिणीला दवाखान्यात घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे. त्यांची बहीण थांबवत असताना त्यांना ढकलूनदेत धक्काभुकी केली असल्याचे म्हटलं आहे. या घटनेची तक्रारदेण्यास पोलीस स्टेशन ला गेले असता त्यांची तक्रार न घेता त्यांना बाहेर हाकलून लावले. तब्ब्ल 5 तास त्यांना पोलीस स्टेशन बाहेर ताटकळत बसवून ठेवले. त्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला आल्यावर उलट महेश बोराडे यांच्यावर चोरीचा व लुटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन तोळे सोन्याची पोत चोरल्याचा खोटा गुन्हा आमच्यावर दाखल केल्याचा आरोप महेश बोराडे यांची बहीण कोमल चंद्रशेखर पारखे यांनी केला आहे.
आम्ही 1 वाजता पोलीस स्टेशनला आलो परंतु आम्हाला 5-6 तास पोलीस स्टेशनच्या बाहेर बसावे लागले. आमची तक्रार घेतली नाही. आरोपी पोलीस स्टेशनला आल्यानंतर 7 वाजता आमची तक्रार घेतली. परंतु आरोपीच्या सांगण्यावरून आमच्यावर चोरीचा व दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला. आम्ही चोरी केली होती तर मग आधी आमच्या विरोधात तक्रार का दिली नाही. आम्ही तक्रार देण्यास आल्या नंतर तब्बल 6 तासांनी आमच्याविरोधात खोटी तक्रार देण्यात आली.या प्रकरणात पोलीस आरोपीला मदत करत असल्याचा आरोप कोमल पारखे यांनी केला आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon