रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 64 वर्षांच्या प्रवासात काय कमावलं आणि काय गमावलं

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या 64 वर्षाच्या प्रवासात काय कमावलं आणि काय गमावलं
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाला 64 वर्ष होत अहेत. स्वतंत्र्य मजदूर पक्ष, अनुसूचित जाती संघ (शेड्युल कास्ट फेडरेशन) च्या नंतर 1956 ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (भारतीय प्रजासत्ताक पक्ष )या पक्षाची स्थापना करण्याची संकल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. दुर्दैवाने 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांचं परिनिर्वाण झालं.

त्यानंतर 1 ऑक्टोबर रोजी एन शिवराज यशवंत आंबेडकर पी टी बोराळे ए जी पवार दत्ता कट्टी आणि दादासाहेब रुपवते यांच्यात नागपूर येथे बैठक पारपडली आणि आजच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबर 1957 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील सार्वभौम अशा राजकीय पक्षाची म्हणजेच भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना होऊन एन शिवराज पक्षाचे अध्यक्ष झाले.देशातील मागासवर्गीय समाजाच्या, शेतकरी, शेतमजदूर,कष्टकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी या पक्षाची स्थापना करण्याची संकल्पना   होती. पक्षाचे ध्येयधोरण हे समतावादी मानवतवादी समाजवादी मुल्यावर आधारित निश्चित करण्यात आलं होत.देशातील मागासवर्गीय समाज व सर्वच स्थरातील गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांचा शासन व प्रशासन दरबारी आवाज उठवण्यासाठी हजारो वर्षांपासून च्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी रिपब्लिकन पार्टी इंडिया या राजकीय पक्षाची स्थापना करण्यामागचा हेतू होता.


देशातील मागासवर्गीय समाजाला न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांना समाजाला सामाजिक शैक्षणिक व राजकीय हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना करण्याची संकल्पना मांडली होती परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मारक ठरलेल्या स्वार्थी नेत्यांनी समाज हिताऐवजी स्वतःच्या हितासाठी पक्षाचा पाजिजे तसा वापर केला.रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यामध्ये पक्षीय एकवाक्यता राहिली नाही.आणि पक्षाला गटा गटात वाटून घेतलं. पक्षाच्या नावामागे आपलं नाव लावू लागले आणि रिपब्लिकन पक्ष आमका गट तमका गट म्हणून मिरवू लागले.जसं रिपब्लिकन पक्षाला गटातटात वाटून  पक्षाचे तुकडे तुकडे केले तसे निळ्या झेंड्याचेही तुकडे करून त्याची लक्तरे केली.रिपब्लिकन पक्षाच्या रथाचे घोडे स्वार्थापायी रथ सोडून पसार झाले आणि रथाचे पार तुकडे तुकडे करून रथतच नष्ट केला.


या स्वार्थी पसार झालेल्या बेलगामी घोडयांना समाजानं  एकवेळा जबरदस्तीने रथाला जुपण्याचं काम केलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला 12 व्या लोकसभेत उगवता सूर्य या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार निवडून आले होते.समाजाच्या रेट्याने एकत्र आलेले स्वार्थी हेकाडी नेते फार काल एकत्र राहू शकले नाहीत.पुन्हा आपापल्या वाटेने चालायला  लागले आणि समाजाला वाऱ्यावर सोडलं. प्रत्येक जन म्हणतो माझाच पक्ष खरा मीच रिपब्लिकन समाजाचा खरा नेता आहे.
रिपब्लिकन पक्षाने काय कमावलं 
वामनदादा कर्डक पुढाऱ्यांना उद्देसून म्हणतात "तुला मिळालं तूप तुला मिळाली साय' समाजाचं काय रे गड्या समाज काय"
नेते मंडळी समाजाच्या नावावर राजकारण करून आपापली पोळी भाजून घेत अहेत पण समाजाला काय दिलं. समाज आहे तिथेच आहे.आता स्वार्थी पुढाऱ्याचे कार्यकर्तेही तसेच वागूलागले. लाचार कोणी कोणाच्याही गाडीत बसू लागले. दारू मटन आणि चिकन साठी कोणाचेही झेंडे हाती घेऊ लागले तरी ते स्वतःला आंबेडकरवादी म्हणून लागले.
 रिपब्लिकन पक्षाने काय गमावलं 
आज रिपब्लिकन पक्षाला 64 वर्ष झालीत.ज्या उद्देशासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पक्षाची संकल्पना मांडली होती तो पक्ष नेते मंडळींच्या जगण्याचं साधन बनला आहे. नेत्यांची वैयक्तिक प्रगती झाली.पक्षामुळे नेत्यांनाचा फायदा झाला.समाज मात्र अजून तसाच आहे.आंबेडकरी समाजाला देशाच्या राजकीय पटलावर समसाज मान्य असा खंबीर राजकीय वारसदार अजून कोणी नाही. आंबेडकरी राजकीय विचाराचा नेता समाजाला मिळावा हीचं या दिवशी अपेक्षा आहे.मात्र रिपब्लिकन पक्षाच्या 64 वर्षाच्या प्रवासात पक्षाचे तुकडे करून नेते मंडळींनी मिळवली "तूप आणि साय" 'समाजाचं मात्र अजून तसाच हाय'. 

What the Republican Party of India gained and lost in its 64-year journey

 Today marks the 64th anniversary of the Republican Party of India, a political party founded by Dr. Babasaheb Ambedkar.  The idea of ​​founding the Republican Party of India (Republic of India) was mooted by Dr. Babasaheb Ambedkar in 1956 after the Freedom Workers Party, Scheduled Caste Federation.  Unfortunately, on December 6, 1956, Babasaheb Ambedkar passed away.

 This was followed by a meeting between N. Shivraj Yashwant Ambedkar, PT Borale, AG Pawar, Datta Katti and Dadasaheb Rupwate at Nagpur on October 1, and today, October 3, 1957, Dr. Babasaheb Ambedkar's sovereign political party, the Republican Party of India, was formed.  The idea was to set up this party for the right to justice of the backward class, farmers, agricultural laborers and hard working people of the country.  The party's motto was based on the egalitarian humanitarian socialist values.

 Dr. Babasaheb Ambedkar had proposed the idea of ​​founding the Republican Party of India to give social, educational and political rights to the backward classes in the country.  There was no party unity among the leaders of the Republican Party. And the party was divided into factions.  They started putting their name after the name of the party and the Republican Party started marching as our group.  Destroyed the chariot.

 The society had once forced these selfish unruly unruly horses to ride on the chariot and as a result, four Republican MPs were elected on the symbol of rising sun in the 12th Lok Sabha.  They started walking their own way and left the society in the lurch.  Everyone says my party is the real leader of the Republican community.

 What the Republican Party earned

 Vamandada Kardak addresses the leaders and says, "You got the ghee, you got the Sai.

 Leaders are burning their nests by doing politics in the name of the community, but what have they given to the community?  The society is where it is. Now the activists of selfish leaders have started behaving in the same way.  Though he started carrying flags for alcohol, mutton and chicken, he considered himself an Ambedkarite.

 What the Republican Party lost

 Today marks the 64th anniversary of the Republican Party.  Leaders made personal progress. Leaders benefited from the party. But the society is still the same.  On this day, the society is expected to get a leader of Ambedkarite political thought.
Previous
Next Post »