काँग्रेसचा स्वबळाचा नारा

 काँग्रेसचा स्वबळाचा नारा :महाराष्ट्रात भिन्न विचार धारा असलेल्या तीन राजकीय पक्षाचं सरकार अस्तित्वात आलं. खरं तर राजकीय सत्ता मिळविण्यासाठी विचारांशी तडजोड करून सत्ता स्थापन केली. परंतु सरकार मधे सर्व काही सुरळीत चाललंय असं नाही. अनेक मंत्र्यांची नाराजी उघड झाल्याची आपण बघितलं आहे. त्यातचं नाना पटोले हे महाराष्ट्र काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस राज्यात स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे अनेक वेळा वक्तव्य केलं आहे. सरकारमधील शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेस च्या स्वबळाच्या नाऱ्या संबंधी टीका टिप्पणी सुद्धा केली. परंतु काँग्रेस चे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सुद्धा राज्यात काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविण्यास हिरवा कंदील दिला आहे. यावरून असं दिसते कि आघाडी सरकार मधे सर्व काही आलबेल नाही. तस पाहिलं तर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवायचा असतो त्याचा विस्तार तर करायचा असतो परंतु आघाडी सरकार मधे काँग्रेस ला सन्मानाची वागणूक मिळत नसावी म्हणून काँग्रेस ने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभेची  निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा नारा दिला आहे. 

Previous
Next Post »