राजस्थानच्या बाडमेर मध्ये भारतीय हवाई दलाचे मिग 21 विमान कोसळले, 2 वैमाणिक बेपत्ता
भारतीय हवाई दलाचे मिग -21 लढावू विमान राजस्थान च्या बाडमेर मध्ये कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली.दुर्घटना ग्रस्त मिग 21 या लढावू विमानात 2 वैमाणिक असल्याची माहिती मिळते.दि.28 जुलै गुरुवारी रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असून विमानातील दोन्ही वैमाणिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेणं सुरु आहे.एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवाई दलाचे मिग -21हे लढावू विमान(MIG-21 fighter aircraft)राजस्थान च्या बाडमेर जिल्ह्यात कोसळले असून त्या विमानात 2 वैमाणिक (2 pilot)होते.विमान कोसळताच जागेवरच पेट घेतला.अपघात झालेल्या विमानाचे तुकडे तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
विमान दुर्घटने नंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तात्काळ घटनेची चौकशी केली.हवाई दल प्रमुख व्ही आर चौधरी यांच्याशी राजनाथ सिंह यांनी संवाद साधून अपघाताबाबतीत चौकशी करून घटनेचे कारण व इतर गोष्टींची विचारपूस केली.मात्र विमानातील दोन्ही वैमानिक बेपत्ता असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon