प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवारी उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून उज्ज्वला २.० योजनेला सुरूवात करणार आहेत.
यावेळी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. उज्ज्वला योजना आणि जागतिक जैवइंधन दिनानिमित्त एक लघुपटही दाखवण्यात येणार आहे . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमृतसर, देहरादून, इम्फाल, उत्तर गोवा आणि गोरखपूर येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रत्येकी एका महिला लाभार्थींशी संवाद साधणार. त्यानंतर ते कार्यक्रमाला संबोधित करतील.
उद्या, 10 ऑगस्ट हा भारताच्या विकासाच्या मार्गासाठी एक विशेष दिवस आहे. मध्यरात्री 12:30 वाजता, उज्ज्वला 2.0 ला महोबा, यूपी मध्ये लोकांच्या हाती कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जाईल.
उज्ज्वला योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली असून बीपीएल कुटुंबातील पाच कोटी महिला सदस्यांना एलपीजी कनेक्शन देण्याचे लक्ष्य निर्धारित होते. त्यानंतर, एप्रिल 2018 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात येवून त्यामधे महिला लाभार्थ्यांच्या आणखी सात श्रेणी समाविष्ट केल्या गेल्या. 8 कोटी एलपीजी कनेक्शनचे लक्ष्यही वाढवण्यात आले. हे लक्ष्य यापूर्वी ऑगस्ट 2019 मध्ये प्राप्त झाले होते.
केंद्र सरकारच्या उज्जवला २.० योजने अंतर्गत या आर्थिक वर्षात गरिब कुटुंबातील लोकांना सुमारे एक कोटी मोफत गॅस कनेक्शन देणार आहे. मोदींनी 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात ही योजना सुरू केली होती. उज्ज्वला 2.0 अंतर्गत 800 रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सिलिंडर आणि स्टोव्ह मोफत पुरवले जाणे अपेक्षित आहे.
प्रधानमंत्री मोदींनी उत्तर प्रदेशातील निवडणूक डोळयासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे . गरीब कुटुंबातील लोकांना या योनेतंर्गत लाभ होईल चांगली बाब आहे. परंतु ही योजना इतर लोकांच्या खिशाला कात्री लावून राबवली जात आहे हे मात्र नक्की आहे.
ConversionConversion EmoticonEmoticon