पती-पत्नीचे भांडण: रागाच्या भरात आईने 6 मुलांना विहिरीत फेकले, सहाही चिमुकल्यांचा मृत्यू


महाड तालुक्यात पती पत्नीच्या भांडणात रागाच्या भरात एका महिलेने तिच्या 6 मुलांना विहिरीत दिले फेकून, सहाही मुलांचा मृत्यू 
महाड : पती पत्नीच्या भांडणात राग अनावर झाल्याने महिलेने तिच्या 6 मुलांना विहिरीत फेकून दिले असल्याची दुर्दैवी घटना महाड तालुक्यातील बोरगाव येथे घडली.या घटनेत सहा ही मुलांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.मुळचे उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेले साहनी कुटुंब सध्या महाड तालुक्यातील शेलटोली येथे रहात होते.पती पत्नीचे काही कारणामुळे भांडण झाल्याने रुना चिकरू साहनी या 30 वर्षीय महिलेने रागाच्या भरात स्वतःच्या 6 मुलांना बोरगाव येथील विहिरीत फेकून दिले.ही घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत सहाही चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.

विहिर दोनशे फूट खोल असल्याने सहाही मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत मुलांपैकी 5मुली तर एक मुलगा आहे. या मृत चिमुकल्यांचे वय दीड ते 10 वर्ष वयोगटातील आहेत.दुपारी मुलांना विहिरीत फेकून दिल्यानंतर महिलेने रात्री 8 वाजता महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध कार्य सुरु केले.विहिरीत शिडी टाकून पोलिसांनी ग्रामस्थ आणि बचाव पथकाच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरु केलं.

विहिरीतील सर्व मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले.मृतामध्ये रेश्मा, करिष्मा, रोशनी,विद्या, राधा व शिवराज या चिमुकल्यांचा समावेश आहे.या प्रकरणी रुना साहनी आणि चिखरू साहनी या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Previous
Next Post »